आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात श्रीलंका-अफगाणिस्तान यांच्यात लढत होत आहे. मात्र पहिल्याच सामन्यात श्रीलंका संघ धारातीर्थी पडला. श्रीलंका संघाच्या फलंदाजांनी अतिशय खराब खेळी केली. अवघ्या पाच धावा असताना श्रीलंकेचे पहिल्या फळीतील तीन फलंदाज बाद झाले. पहिल्याच फळीतील बडे फलंदाज बाद झाल्यामुळे संघ १०० धावा करू शकणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र श्रीलंकेचे खेळाडू कसेबसे १०५ धावा करू शकले. विजयासाठी अफगाणिस्तानसमोर १०६ धावांचे लक्ष्य आहे.

सलामीला आलेल्या पाथुम निसांका (३)-कुशल मेंडिस (२) जोडीने निराशा केली. तर दुसऱ्या विकेटसाठी आलेला असलंका शून्यावर बाद झाला. त्यानंतर गुनाथिलका (१७) आणि भानुका राजपक्षे (३८) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तेदेखील मैदानात जास्त काळ तग धरू शकले नाही. पाचव्या विकेटसाठी आलेल्या हसरंगानेही निराशा केली. तो अवघ्या दोन धावा करू शकला. तर कर्णधार शनाका संघाला सावरेल अशी आशा होती. मात्र तो खातंदेखील खोलू शकला नाही. त्यानंतर करुणारत्नेने ३१ धावा करत संघासाठी मोठे योगदान दिले. त्याच्या खेळीमुळेच संघ १०५ धावांपर्यंत पोहोचू शकला. शेवटच्या फळीतील माहीश थिक्षाना (०) दिलशान मदुशंका (१), मथिशा पाथिराना (५) यांनी अवघ्या सहा धावा केल्या.

श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन

दनुष्का गुनाथिलका, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टिक्षक), चरिथ असलंका, भानुका राजपक्षे, दासून शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, माहीश थिक्षणा, दिलशान मदुशंका, मथिशा पाथिराना

अफगाणिस्तानचे प्लेइंग इलेव्हन

हजरतुल्ला जझाई, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झरदान, करीम जनात, नजीबउल्ला झरदान, मोहम्मद नबी (कर्णधार), राशीद खान, अजमातुल्ला उमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी