आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची कामगिरी केली. त्याने गोलंजादी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत चांगला खेळ करून भारताला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी शेवटच्या षटकात पंड्याने एकदम शांत प्रतिक्रिया देत ‘मी आहे ना’ असं खुणावत कार्तिकला मागे जाऊन त्याच्या जागी थांबायला सांगितले. त्याला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही पंड्याची व्हिडीओ शेयर करत, भन्नाट कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा – Viral Video: कॉन्फिडन्स असावा तर असा! विजयी षटकार मारण्याआधी पांड्याने केलं असं काही की…

कार्तिकने शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एकच धाव घेत हार्दिक पंड्याला स्ट्राइक दिली. यावेळी तिसर्‍या चेंडूवर पंड्याला खेळता आले नाही, खेळ शेवटच्या टप्प्यात आल्याने अशावेळी चेंडू सोडणे महाग पडू शकते, अशा भावनेने कार्तिकने पांड्याकडे पाहिले. याचवेळी पांड्याने एकदम शांत प्रतिक्रिया देत ‘मी आहे ना’ असं खुणावत कार्तिकला मागे जाऊन त्याच्या जागी थांबायला सांगितले.

हेही वाचा – विराट कोहलीच्या फॉर्मबाबत वसीम जाफरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “ती ३५ धावांची खेळी…”;

दरम्यान, अनेकांनी या व्हिडीओचा वापर करत सोशल मीडियावर याचे मीम्स् शेअर केलेत. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याही मागे नव्हत्या. पंड्याची व्हिडीओ शेयर करत त्यांनी ”जेव्हा ते म्हणातात, आज सोमवार आहे”, असे कॅप्शन दिले.

दरम्यान, १७ चेंडूत ३३ धावा काढत पंड्या कालच्या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. विश्वचषकात ज्या मैदानावर भारताला जिव्हारी लागेल, असा पराभव पत्करावा लागला होता. त्याच मैदानावर पाकिस्तानला धूळ चारत टीम इंडियाने विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढला.