Smriti Mandhana Century in IND W vs SA W 1st ODI: अमेरिका न्यूयॉर्कमध्ये टी-२० विश्वचषकाचे सामने सुरू असतानाच भारतात महिला क्रिकेट संघ वनडे मालिका खेळत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारतात खेळवली जात आहे, ज्यातील पहिला सामना आज १६ जूनला बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सलामीवीर आणि भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने अर्धशतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावे केली आहे.

हेही वाचा – IND vs CAN सामना रद्द झाल्याने सुनील गावसकर ICC वर भडकले, म्हणाले; “मॅच खेळवूच नका…”

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, मात्र सलामीवीर फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना हिने संघाचा डाव सांभाळत निर्णायक खेळी केली. यादरम्यान स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठी कामगिरी आपल्या नावे केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. ९९ धावांवर भारतीय संघाचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र, उपकर्णधार स्मृती मानधानीने संघाच्या डावाची धुरा सांभाळत ६१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे तिचे एकदिवसीय कारकिर्दीतील २७वे अर्धशतक ठरले.

हेही वाचा – IND vs CAN: पाऊस नसतानाही का रद्द झाला भारत वि कॅनडा सामना? जाणून घ्या कारण

हेही वाचा – Fathers Day 2024: अनुष्का शर्माचं विराटला ‘फादर्स डे’ निमित्त खास सरप्राईज, वामिका आणि अकायने खास अंदाजात केलं विश

स्मृती मानधनाचे संयमी शतक

दुसऱ्या टोकाला सतत पडणाऱ्या विकेट्सदरम्यानही मानधना एका टोकाला पाय घट्ट रोवून उभी होती. तिने शेफाली वर्मा (७) सोबत पहिल्या विकेटसाठी १५, दयालन हेमलता (१२) सोबत दुसऱ्या विकेटसाठी १७, कर्णधार हरमनप्रीत कौर (१०) सोबत तिसऱ्या विकेटसाठी २३ आणि जेमिमा रॉड्रिग्ज (१७) सोबत तिसऱ्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी केली. तर चौथ्या विकेटसाठी 37 आणि ऋचा घोष (३) सोबत पाचव्या विकेटसाठी सात धावांची भागीदारी केली. स्मृती एकटीच दक्षिण आफ्रिकेच्या संघावर भारी पडली आणि फक्त अर्धशतकचं नाही तर १२७ चेंडूत तिने १२ चौकार आणि एका षटकारासह ११७ धावा करत संघाला मोठी धावसंख्या रचण्यात मदत केली.

हेही वाचा – रोहित-गिलमध्ये खरंच बिनसलंय? शुबमनवर शिस्तभंगाची कारवाई? भारताच्या बॅटिंग कोचने केला मोठा खुलासा

स्मृती मानधनाने तिच्या या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारी स्मृती मानधना ही भारतीय महिला संघाची दुसरी खेळाडू ठरली, याआधी मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला होता. यासह, स्मृती महिला क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ५० हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने महिलांच्या एकदिवसीय मालिकेत ३२ वेळा ५०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर शार्लोट एडवर्ड्स (२८ वेळा) दुसऱ्या स्थानावर आणि मानधना (२७ वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे.

महिला एकदिवसीय मालिकेत सलामीवीर म्हणून ५० हून अधिक धावा करणारे खेळाडू

३२ वेळा- सुझी बेट्स

२८ शार्लोट एडवर्ड्स

२७ वेळा- स्मृती मानधना

२७ वेळा- लॉरा वोल्वार्ड

२५ वेळा- बेलिंडा क्लार्क