Smriti Mandhana gifts a Mobile phone to special fan : महिला आशिया चषक २०२४ चा दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात श्रीलंकेतील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही चमकदार कामगिरी केली. भारताकडून या सामन्यात स्मृती मानधनाने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले. सामन्यानंतर स्मृतीचा श्रीलंकन चाहतीबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत, ज्यामध्ये तिने चांहत्यांची मनं जिंकली.

स्मृती मानधनाने खास चाहतीला मोबाईल फोन गिफ्ट केला –

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर स्मृती मानधनाने आपल्या एका खास दिव्यांग चाहतीची भेट घेतली. व्हिलचेअरवरुन भेटायला आलेल्या आदिशा हेराथचे क्रिकेटवरील प्रेम तिला सर्व आव्हानांना न जुमानता स्टेडियमपर्यंत घेऊन आले. त्यामुळे आज दिवस तिच्यासाठी खूप खास होता. कारण तिची आवडती क्रिकेटर स्मृती मानधना हिला भेटण्याची संधी मिळाली, जिने तिला कृतज्ञता म्हणून मोबाईल फोन गिफ्ट दिला. त्याचबरोबर तिच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्याचबरोबर मैदानावर तिच्याबरोबर काही फोटोही काढले. या खास क्षणाचा व्हिडीओ श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक्सवर शेअर केला आहे.

स्मृती मानधनावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव –

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओ आता व्हायरल होत असून चाहते स्मृतीचे कौतुक करत आहेत. या व्हिडीओवर चाहते कमेंट करुन मोठ्या आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सामन्यातील स्मृतीच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर तिन पहिल्या विकेट्साठी शफाली वर्मासह ८५ धावांची भागीदारी केली. यानंतर स्मृतीने अवघ्या पाच धावांनी अर्धशतक हुकले. तिने ३१ चेंडूचा सामना करताना ९ चौकारांच्या मदतीने ४५ धावांची खेळी साकारली.

हेही वाचा – T20 Blast 2024 : लाइव्ह मॅचमध्ये कोल्हा मैदानात घुसल्याने खेळाडूंची उडाली तारांबळ, VIDEO व्हायरल

पाकिस्तानच्या संघाला १०८ धावांवर गुडाळले –

टीम इंडियाने पाकिस्तानला १०८ धावांवर ऑलआउट केले. निदा दारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाकडून अमीनने सर्वाधिक २५ धावा केल्या. तिने ३५ चेंडूंचा सामना करत ३ चौकार मारत २२ धावांची खेळी केली. फातिमा सनाने १६ चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद २२ धावा केल्या. सनाने एक चौकार आणि दोन षटकार मारले. हसनने १९ चेंडूंचा सामना करत २२ धावा केल्या. तिने ३ चौकार मारले.

हेही वाचा – ENG vs WI 2nd Test : ‘भावा, घरी बायका मुलं आहेत जरा बेताने…’, वेगवान मार्क वूडला केव्हिन हॉजचं सांगणं, पाहा VIDEO

दीप्ती शर्माने घेतल्या सर्वाधिक विकेट्स –

भारतीय गोलंदाजांची या सामन्यात चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. दीप्ती शर्माने ४ षटकात २० धावा देत ३ विकेट्स घेतल्या. दीप्तीने ८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पाकिस्तानचा कर्णधार निदाची विकेट घेतली. त्याचबरोबर हसन २२ धावांच्या वैयक्तिक धावांवर बाद केले. तसेच रेणुका सिंग, श्रेयंका पाटील आणि पूजा यांनी २-२ विकेट्स घेतल्या.