Smriti Mandhana Palash Muchhal Family Meet Video: टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न २०२५ मध्ये मोडलं. २०२५ मधील सर्वात चर्चेत असलेलं हे लग्न मोडल्यानंतर अनेक विविध चर्चांना उधाण आलं होतं. स्मृती मानधनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याची माहिती दिली होती. तर पलाश मुच्छलने देखील याबाबत पोस्ट करत त्यांचं नातं संपल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा दोघांचं पॅचअप झाल्याच्या चर्चांना एका व्हीडिओमुळे उधाण आलं आहे.
जेव्हा पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांचा विवाह मोडला, तेव्हा सर्वत्र त्याचीच चर्चा होती. पलाशवर फसवणुकीचा आरोप झाला होता. मेहंदी, हळदी झाल्यानंतर लग्नादिवशीच या दोघांचं लग्न मोडलं. पण आता असं म्हटलं जात आहे की दोन्ही कुटुंबातील मतभेद दूर झाले आहेत. स्मृती मानधनाचे वडील आणि पलाश मुच्छलची बहीण यांच्या भेटीचा व्हीडिओ समोर आला आहे.
स्मृती-पलाशचं भांडण मिटलं, आता सनई-चौघडे वाजणार?
पलाश आणि स्मृतीच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट झाली. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पलाश मुच्छलची बहीण आणि गायिका पलक मुच्छल दिसत आहे. स्मृती मानधनाचे वडील, श्रीनिवास मानधना, हे देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पलकचा नवरा, मिथुन, देखील त्यांच्यासोबत दिसला. हे तिघे मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसले होते. सोशल मीडियावर या दोन्ही कुटुंबाना एकत्र पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.
रेस्टॉरंटमधून तिघे बाहेर आल्यानंतर पलक मुच्छल श्रीनिवास मानधना यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर स्मृतीचे वडील तिथून निघतात. त्यानंतर पलक नवऱ्यासोबत फोटोसाठी पॅपराझींना पोझ देताना दिसली. आता दोन्ही कुटुंबांच्या या भेटीनंतर स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांच्यातील मतभेद मिटत दोघे पुन्हा लग्न करणार का, असे प्रश्न चाहते विचारत आहेत. आता त्यांना एकत्र पाहिल्यानंतर, कुटुंब पलाश आणि स्मृती यांच्यातील नातेसंबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जेव्हा पलाश आणि स्मृतीचं लग्न त्यांच्या लग्नादिवशीच अचानक रद्द झालं, तेव्हा काय झाले असेल याचा सर्वांनाच प्रश्न पडला होता. त्यावेळी, स्मृतीचे वडील आजारी पडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र, काही काळानंतर अनेक स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आणि पलाशवर फसवणूक केल्याचा आरोप झाला.
मात्र, आता इतक्या महिन्यांनंतर, दोन्ही कुटुंबांमधील संबंध खरोखरच सुधारले आहेत का आणि स्मृती-पलाश खरंच पुन्हा लग्न करण्याचा विचार करत आहेत का, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
