स्मृती मानधनाची बॅट महिलांच्या आशिया चषकात तळपली आहे. स्मृतीने झंझावाती शतक झळकावलं आहे. महिलांच्या आशिया चषकात आज ३ सप्टेंबरला भारताचा सामना हाँगकाँग चीनविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात सलामीला आलेल्या स्मृती मानधनाने शतकी खेळी साकारली. स्मृतीने ५७ चेंडूत दणदणीत शतक झळकावलं. या शतकी खेळीदरम्या स्मृतीने ११३ धावांची खेळी करताच विश्वविक्रम केला आहे.
हाँगकाँग चीनने महिलांच्या टी-२० आशिया चषकातील भारताविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह स्मृती मानधना व शफाली वर्माची जोडी फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यादरम्यान स्मृतीने संथ सुरूवात केली खरी पण यानंतर तिने शतकासह मोठी विक्रमी खेळी साकारली. स्मृती मानधनाने या सामन्यात ६४ चेंडूत १४ चौकार व ७ षटकारांसह १२४ धावांची विक्रमी खेळी साकारली. या खेळीदरम्यान स्मृतीचा स्ट्राईक रेट १९३.७५ होता. स्मृती अखेरचा षटकात धावबाद झाली.
स्मृती मानधनाचं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे आणि महिला आशिया चषकात शतक झळकावणारी ती पहिली भारतीय खेळाडूही ठरली आहे. या सामन्यात तिने संथ सुरुवात केली असली, तरीही ती शतकाचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारी खेळाडू म्हणूनही मानधनाने आता स्थान मिळवलं आहे; तिची एकूण आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या १८ वर पोहोचली आहे.
स्मृती मानधनाने २०२६ च्या महिला टी-२० आशिया चषकात शतकी खेळीसह ११३ धावा करत मिताली राजचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. यासह स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. स्मृती मानधनाने १२४ धावा करत महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०८७९ धावा केल्या आहेत. या यादीत मिताली राज, सुझी बेट्स, चार्लोट एड्वर्ड्स हे खेळाडू आहेत.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज
स्मृती मानधना (भारत) – १०,८७९ धावा
मिताली राज (भारत) – १०,८६८ धावा
सुझी बेट्स (न्यूझीलंड) – १०,७४० धावा
चार्लोट एड्वर्ड्स (इंग्लंड) – १०,२७३ धावा
स्टाफेन टेलर (वेस्ट इंडिज) – १०,००७ धाव
