दिल्ली खुली टेनिस स्पर्धा : सोमदेव उपांत्य फेरीत

डेव्हिसपटू सोमदेव देववर्मनने दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. मात्र भारताची अव्वल दर्जाची खेळाडू पुण्याच्या अंकिता रैनाला पराभवाचा धक्का बसला.

डेव्हिसपटू सोमदेव देववर्मनने दिल्ली खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. मात्र भारताची अव्वल दर्जाची खेळाडू पुण्याच्या अंकिता रैनाला पराभवाचा धक्का बसला.
सोमदेवने चीनच्या झेई झांग याच्याविरुद्ध ६-२ असा पहिला सेट जिंकला. मात्र त्यानंतर खांदा दुखावल्यामुळे झांग याने सामन्यातून माघार घेतली. सोमदेवने चेन्नई व कोलकाता येथील एटीपी स्पर्धामध्येही उपांत्य फेरी गाठली होती.
महिलांच्या एकेरीत अंकिताने युक्रेनची खेळाडू युलिया बेगेलझिमेरला चिवट झुंज दिली. मात्र हा सामना तिला ३-६, ५-७ असा गमवावा लागला. दोन तास पाच मिनिटे चाललेल्या या लढतीत अंकिताने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. मात्र दोन्ही सेटमध्ये तिची सव्‍‌र्हिस ब्रेक करण्यात युलिया हिला यश मिळाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Somdev devvarman reaches delhi atp challenger semifinals