पहिला दिवस बरोबरीत!

डेव्हिस चषकात आशिया/ओश्ॉनिया पहिल्या गटाच्या कोरियाविरुद्धच्या तुल्यबळ लढतीत पहिल्या दिवशी भारताने कोरियाशी बरोबरी साधली.

डेव्हिस चषकात आशिया/ओश्ॉनिया पहिल्या गटाच्या कोरियाविरुद्धच्या तुल्यबळ लढतीत पहिल्या दिवशी भारताने कोरियाशी बरोबरी साधली. खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या सोमदेव देववर्मनने शानदार खेळ करत विजयी सलामी दिली. मात्र एकेरीच्या दुसऱ्या लढतीत सनम सिंगला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे कोरियाला १-१ अशी बरोबरी करता आली.  डेव्हिस चषकात पदार्पणाची लढत खेळणाऱ्या आणि जागतिक क्रमवारीत सोमदेवपेक्षा २८९ गुणांनी पिछाडीवर असणाऱ्या च्युंगने सोमदेवला प्रत्येक गुणासाठी झुंजवले.
ह्य़ुआन च्युंगच्या संघर्षांला जबरदस्त टक्कर देत सोमदेवने तीन तास आणि ३४ मिनिटांनंतर ७-६ (४), ७-६ (३), ६-४ असा विजय मिळवला. च्युंगने पहिल्या सेटमध्ये ४-१, तर दुसऱ्या सेटमध्ये ५-२ अशी आघाडी घेतली होती, मात्र आपला अनुभव पणाला लावत सोमदेवने सरशी साधली. साकेत मायनेनीऐवजी संधी मिळालेल्या सनम सिंगला दुसऱ्या एकेरीत विजय मिळवता आला नाही. यांग क्यु लिमने सनमवर ६-७ (५), ६-४, ६-४ अशी मात केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Somdev wins but sanam loses as india korea share honours