महिला प्रीमियर लीगमधील १६ व्या सामन्यात मुंबईच्या ब्रेबॉर्नवर स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात जायंट्स हे दोन संघ भिडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ४ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु त्याउत्तरात खेळणाऱ्या आरसीबीच्या महिला खेळाडूंसमोर हा डोंगर म्हणजे टेकडी वाटू लागला. कारण आरसीबीची सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज सोफी डिवाईनने हा सामना एकहाती जिंकला. आज ब्रेबोर्नच्या मैदानात सोफी नावाचं वादळ पाहायला मिळालं.

सोफीने या सामन्यात अवघ्या ३६ चेंडूत ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ९९ धावा फटकावल्या. सोफीचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. ती शतक साजरं करू शकली नसली तरी बाद होण्यापूर्वी तिने आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं. त्यानंतर उर्वरित कामगिरी एलिस पेरी आणि हेदर नाईट या दोघींनी पूर्ण केली. १८९ धावांचं लक्ष्य आरसीबीने १६ व्या षटकात पूर्ण केलं. आरसीबीने ८ फलंदाज आणि २७ चेंडू राखून गुजरात जायंट्सचा पराभव केला. हा आरसीबीचा सलग दुसरा विजय होता. या विजयासह आरसीबीने त्यांच्या प्लेऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
Ranji Trophy 2024 Semi Final Updates in Marathi
Ranji Trophy 2024 : श्रेयस अय्यर मुंबईकडून उपांत्य फेरी खेळण्यासाठी उपलब्ध, एमसीएने दिली माहिती
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

सोफीचं आयपीएलमधलं शतक हुकलं असलं तरी महिला टी-२० मधलं सर्वात वेगवान शतक तिच्याच नावावर आहे. न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने ३६ चेंडूत शतक ठोकलं आहे.

हे ही वाचा >> WPL 2023 RCBW vs GGW: आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा आठ गडी राखून पराभव; सोफी डिव्हाईनची वादळी खेळी

युसूफ पठाणचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला

सोफीने आजच्या सामन्यात आयपीएलमधल्या दुसऱ्या सर्वात वेगवान शतकाची बरोबरी करण्याची संधी गमावली. इंडियन प्रीमयर लीगमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आरसीबीकडून खेळताना पुण्याविरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकलं होतं. तर यादीत दुसरा क्रमांक भारताचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाणच्या नावावर आहे. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबईविरोधात अवघ्या ३७ चेंडूत शतक ठोकलं होतं. सोफीने ३६ चेंडूत ९९ धावा फटकावल्या.