मुंबईच्या ब्रेबॉर्नवर धडकलं ‘सोफी’ वादळ, ९ चौकार, ८ षटकारांसह कुटल्या ९९ धावा, युसूफ पठाणचा रेकॉर्ड…

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स या सामन्यात आरसीबीच्या सोफी डिवाईनने वादळी खेळी केली.

Sophie Devine
रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची गुजरात जायंट्सवर मात (PC : Twitter/@wplt20)

महिला प्रीमियर लीगमधील १६ व्या सामन्यात मुंबईच्या ब्रेबॉर्नवर स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि गुजरात जायंट्स हे दोन संघ भिडले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ४ बाद १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. परंतु त्याउत्तरात खेळणाऱ्या आरसीबीच्या महिला खेळाडूंसमोर हा डोंगर म्हणजे टेकडी वाटू लागला. कारण आरसीबीची सलामीवीर आणि आक्रमक फलंदाज सोफी डिवाईनने हा सामना एकहाती जिंकला. आज ब्रेबोर्नच्या मैदानात सोफी नावाचं वादळ पाहायला मिळालं.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

सोफीने या सामन्यात अवघ्या ३६ चेंडूत ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ९९ धावा फटकावल्या. सोफीचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. ती शतक साजरं करू शकली नसली तरी बाद होण्यापूर्वी तिने आरसीबीला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं. त्यानंतर उर्वरित कामगिरी एलिस पेरी आणि हेदर नाईट या दोघींनी पूर्ण केली. १८९ धावांचं लक्ष्य आरसीबीने १६ व्या षटकात पूर्ण केलं. आरसीबीने ८ फलंदाज आणि २७ चेंडू राखून गुजरात जायंट्सचा पराभव केला. हा आरसीबीचा सलग दुसरा विजय होता. या विजयासह आरसीबीने त्यांच्या प्लेऑफच्या आशा जीवंत ठेवल्या आहेत.

सोफीचं आयपीएलमधलं शतक हुकलं असलं तरी महिला टी-२० मधलं सर्वात वेगवान शतक तिच्याच नावावर आहे. न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने ३६ चेंडूत शतक ठोकलं आहे.

हे ही वाचा >> WPL 2023 RCBW vs GGW: आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा आठ गडी राखून पराभव; सोफी डिव्हाईनची वादळी खेळी

युसूफ पठाणचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला

सोफीने आजच्या सामन्यात आयपीएलमधल्या दुसऱ्या सर्वात वेगवान शतकाची बरोबरी करण्याची संधी गमावली. इंडियन प्रीमयर लीगमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने आरसीबीकडून खेळताना पुण्याविरुद्ध ३० चेंडूत शतक ठोकलं होतं. तर यादीत दुसरा क्रमांक भारताचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाणच्या नावावर आहे. त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना मुंबईविरोधात अवघ्या ३७ चेंडूत शतक ठोकलं होतं. सोफीने ३६ चेंडूत ९९ धावा फटकावल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 23:04 IST
Next Story
WPL 2023 : RCB चा दुसरा विजय पण चर्चा तर सोफी डिवाईनचीच! अवघ्या २० चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक
Exit mobile version