आशिया चषक स्पर्धेतून भारत बाहेर पडला असला तरी, विराट कोहलीचा परत आलेला फॉर्म भारतीय संघासाठी दिलासादायक बाब आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात कोहलीने ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावत आपण फॉर्ममध्ये असल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, सौरव गांगुलीने एका कार्यक्रमात विराटसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Video: तेंडुलकरची बॅट पुन्हा तळपली; दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सचिनचा ‘हा’ एक शॉट खाऊन गेला भाव

कर्णधार पदाच्या वादामुळे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात फारसे चांगले संबंध नाहीत. दरम्यान, ‘द रणवीर शो’ या कार्यक्रमात शतकीय खेळीनंतर कोहलीला सल्ला देशील असा प्रश्न विचारला असता, गांगुलीने भन्नाट उत्तर दिले. ”मी बीसीसीआयचा अध्यक्ष असलो, तरी माझी आणि विराट कोहलीची भेट होत नाही. तो नेहमी प्रवासात असतो”, असे तो म्हणाला.

हेही वाचा – ‘एमसीए’च्या अध्यक्षपदासाठी संदीप पाटील इच्छुक

दरम्यान, आशिया चषकात अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या सुपर ४ च्या सामन्यात विराट कोहलीने ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकाल्यानंतर भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. येत्या काळात टी-२० विश्वचषक स्पर्धा आहे. त्यापार्श्वभूमीवर विराट कोहलीचे फॉर्ममध्ये असणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच भारतीय संघ विश्वचषकापूर्वी सहा टी-२० सामने खेळणार आहे. यापैकी ३ ऑस्ट्रेलिया आणि ३ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असणार आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने हे सहाही सामने अतिशय महत्त्वाचे असणार आहे.