इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. जगभरात धोनीचे अनेक चाहते आहेत, मात्र एकेकाळचा आपलाच सहकारी युवराज सिंहच्या वडिलांकडून धोनीला नेहमी टीका सहन करावी लागली आहे. काही दिवसांपूर्वी News24 वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंह यांनी धोनी-कोहलीने युवराजच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. याचवेळी योगराज यांनी धोनीच्या संघातील योगदान आणि नेतृत्वाबद्दलही शंका व्यक्त केली.

“सौरव गांगुलीने संघातील तरुण खेळाडूंना संधी देण्यापासून त्यांना तयार करण्यापर्यंत मोठं काम केलं आहे, धोनीने संघातल्या तरुणांसाठी असं काय केलंय?? मला हा प्रश्न त्याला विचारायचा आहे, गेली अनेक वर्ष तो भारतीय संघाकडून खेळतोय. सौरव गांगुलीने आपल्या संघासोबत, खेळाडूंचा आणि देशाचा पहिला विचार केला म्हणूनच भारतीय क्रिकेटमध्ये आज त्याला मानाचं स्थान आहे.” योगराज यांनी News24 ला दिलेल्या मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं.

अवश्य वाचा – धोनी-विराटने युवराजच्या पाठीत खंजीर खुपसला, वडील योगराज सिंह यांचा आरोप

महेंद्रसिंह धोनी २०२० आयपीएल मधून मैदानावर पुन्हा पुनरागमन करणार होता. मात्र करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएलचा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित गेला आहे. मार्च महिन्यात धोनी चेन्नई सुपरकिंग्जच्या सरावसत्रातही सहभागी झाला होता. मात्र ट्रेनिंग कँप बंद झाल्यानंतर धोनीने रांचीला आपल्या घरी परतण्याचं ठरवलं. धोनी सध्या आपल्या परिवारासह रांचीत आपल्या फार्महाऊसमध्ये राहतो आहे.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास वर्षाअखेरीस आयपीएल शक्य !