Sourav Ganguly giving advice to Team India: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ५ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा विश्वचषक भारताच्या यजमानपदी खेळवला जाणार असल्याने त्यासाठी तो जगज्जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारताचा माजी क्रिकेटर सौरव गांगुलीने विश्वचषक जिंकण्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला की, या स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली, तर ते विश्वचषक जिंकू शकतात. भारतीय संघ मजबूत असल्याचे गांगुलीने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. भारताने चांगली फलंदाजी केली तर विश्वचषक जिंकू शकतो.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
What Revanth Reddy Said?
Revanth Reddy : “महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण…”, रेवंथ रेड्डी काय म्हणाले?
Farmer leader Vijay Javandhia referenced Varhadi poet Vitthal Waghs poem in his comment in nagpur
”आम्ही मेंढर.. मेंढर..पाच वर्षाने होतो, आमचा लीलाव..’’, जावंधियांचे निवडणुकीवर भाष्य
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?
marathi actor atul kulkarni
वेडी आशा
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

सौरव गांगुलीने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी दिला गुरुमंत्र –

भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली म्हणाला, “भारताला चांगली फलंदाजी करावी लागेल. भारताने चांगली फलंदाजी केली तर ते जिंकतील. विश्वचषक वेगळा आहे. आशिया चषक वेगळा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मायदेशातील मालिका वेगळी असेल. प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघ कसा खेळतो यावर अवलंबून असेल. भारत हा एक मजबूत संघ आहे, पण त्यांना विश्वचषकादरम्यान चांगला खेळ करावा लागेल.”

हेही वाचा – Gautam Gambhir: ‘…म्हणून आजही २००७ च्या टी-२० विश्वचषकाबद्दल वाटते खंत’; गौतम गंभीरने केला खुलासा

आशिया कप २०२३ साठी १७ सदस्यीय भारतीय संघ निवडल्याबद्दल सौरव गांगुलीने आनंद व्यक्त केला आहे. गांगुली म्हणाला की, भारतीय संघाला फक्त चांगले खेळण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, भारत आशिया चषक स्पर्धेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबर रोजी खेळणार आहे.

हेही वाचा – VIDEO: विराट-बाबर नव्हे तर ‘हा’ खेळाडू विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार…! जॅक कॅलिसने केलं मोठं भाकीत

सौरव गांगुली म्हणाला की, पाकिस्तानचा संघ संतुलित आहे आणि त्यांच्या दिवशी तो अधिक चांगला खेळून सामना जिंकू शकतो. त्याचबरोबर भारतीय संघाला यंदाच्या आठव्या आशिया चषकाचे विजेतेपदही आपल्या नावावर करायचे आहे. सौरव गांगुली म्हणाला, “पाकिस्तानचा संघ खूप चांगला आहे. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे, ज्यात शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांचा समावेश आहे. पाकिस्तानचा संघ अतिशय संतुलित आहे. भारतही मजबूत संघ आहे. त्या दिवशी कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.”