Sourav Ganguly Picks Team India Squad For World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा सुरु होण्याची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे लवकरच यासाठी भारतीय संघ देखील घोषित केला जाईल. मात्र, विश्वचषकापूर्वी टीम इंडिया आशिया कप २०२३ मध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात वनडे मालिका खेळायची आहे. आशिया चषकासाठी संघ निवड झाल्यानंतर आता विश्वचषक संघाचे चित्रही जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक माजी भारतीय खेळाडू आपापल्या १५ सदस्यीय संघाची निवड करत आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीही यामध्ये सामील झाला आहे.

भारताने आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी १७ सदस्यीय संघ निवडला आहे, तर विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघ निवडायचा आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही विश्वचषकाचा संघ जवळपास आशिया कपसारखाच असेल, असे स्पष्ट केले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

गांगुलीने मधल्या फळीतील अनुभवावर व्यक्त केला विश्वास –

भारताने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भाग घेतला होता, जिथे टीम इंडिया या स्पर्धेची उपविजेती होती. टीम इंडियाच्या या माजी सलामीवीर फलंदाजाने आपल्या संघातील अनुभवाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्यातरी तिलक वर्मासारख्या युवा प्रतिभा असलेल्या खेळाडूची निवड केलेली नाही.

हेही वाचा – World Cup 2023: भारताच्या माजी कोचने विश्वचषकासाठी निवडला संघ, आशिया चषकमधील ‘या’ खेळाडूंना वगळले

विश्वचषकाच्या शर्यतीतही संजू सॅमसन पडला मागे –

काही महिन्यांपूर्वीपर्यंत संजू सॅमसन विश्वचषक स्पर्धेसाठी संघात आपले स्थान निश्चित करेल असे वाटत होते, परंतु त्याची खराब कामगिरी आणि इशान किशनची चमकदार कामगिरी त्याच्यावर भारी पडताना दिसत आहे. बॅकअप खेळाडू म्हणूनही गांगुलीने त्याची संघात निवड केलेली नाही. यापूर्वी आशिया कपसाठी त्याचा बॅकअप खेळाडू म्हणून समावेश केला होता.स्टार स्पोर्ट्स या क्रिकेट ब्रॉडकास्टर चॅनलवर सौरव गांगुलीने त्याची ‘माय वर्ल्ड कप 15’ टीम निवडली. या संघात त्याने दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुलवर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, त्याने लेगस्पिनर युजवेंद्र चहलला प्राधान्य दिलेले नाही.

सौरव गांगुलीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा – Team India: शुबमन गिलने Yo-Yo Test मध्ये मारली बाजी, विराट कोहलीला मागे टाकत ठरला अव्वल

बॅकअप खेळाडू म्हणून तीन खेळाडूंना दिले स्थान –

बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी बॅकअप खेळाडू म्हणून तीन खेळाडूंना स्थान दिले आहे. एखादा फलंदाज जखमी झाल्यास मी तिलक वर्माला संधी देईन, वेगवान गोलंदाज जखमी झाल्यास प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळेल, तर फिरकी गोलंदाजाच्या जागी युजवेंद्र चहल स्टँडबाय खेळाडू असेल, असे तो येथे म्हणाला.

Story img Loader