Sourav Ganguly on KL Rahul: भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला टीका टाळण्यासाठी केएल राहुलला चांगली कामगिरी करावी लागेल. भारतात धावा केल्या नाहीत तर टीकेला सामोरे जावे लागेल, असे दिल्ली कॅपिटल्सच्या आयपीएल प्री-सीझन कॅम्पमध्गांये बोलताना गांगुली म्हणाला. तो म्हणाला की, भारताच्या माजी खेळाडूंनी चांगल्या कामगिरीने राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी उच्च मापदंड प्रस्थापित केले आहेत. जर त्यानुसार कामगिरी केली नाही, तर प्रत्येक खेळाडूला टीकेला सामोरे जावे लागेल.

सौरव गांगुली म्हणाला, “जेव्हा तुम्ही भारतात धावा करत नाही, तेव्हा तुमच्यावर नक्कीच टीका होईल. केएल राहुल एकटा नाही. याआधीही अनेक खेळाडूंवर टीका झाली आहे. खेळाडूंवर खूप दडपण असते आणि त्यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असते. संघ व्यवस्थापनाला वाटते की तो संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. दिवसाच्या शेवटी प्रशिक्षक आणि कर्णधार काय विचार करतात हे महत्त्वाचे असते.”

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
Viral Video Lionesses Attack Lion Buffalo Fight Video
VIDEO: “फक्त साथ देणारा कट्टर पाहिजे” म्हशीची शिकार करण्यासाठी सिंहीणीचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

टॉप ऑर्डर बॅट्समनकडून खूप अपेक्षा आहेत –

सौरव गांगुली पुढे म्हणाला, “त्याने चांगली कामगिरी केली आहे, पण अर्थातच तुम्हाला भारताकडून खेळणाऱ्या टॉप ऑर्डर बॅट्समनकडून खूप अपेक्षा आहेत. कारण इतरांनी उच्च मापदंड स्थापित केले आहेत. जेव्हा तुम्ही थोड्या काळासाठी अयशस्वी व्हाल, तेव्हा नक्कीच टीका होईल. मला खात्री आहे की राहुलकडे क्षमता आहे आणि जेव्हा त्याला अधिक संधी मिळतील. तेव्हा तो धावा करण्याचे मार्ग शोधेल.”

हेही वाचा – ESP vs IOM: आयल ऑफ मॅनचा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम: संपूर्ण संघ अवघ्या ‘इतक्या’ धावांवर आटोपला

राहुलच्या तंत्रावर बोलताना गांगुली म्हणाला, “तुम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळत असाल, तर तेही अवघड होते. कारण चेंडू वळत असतात आणि उसळत असतात. असमान उसळी असते आणि जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा ते आणखी कठीण होते.” उपकर्णधारपदावरून वगळण्यात आलेल्या राहुलने शेवटच्या १० कसोटी डावांमध्ये २५ धावांचा टप्पा ओलांडलेला नाही. ४७ कसोटीत ३५ पेक्षा कमी सरासरी त्याच्या खऱ्या क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे.

हेही वाचा – NZ vs ENG 2nd Test: केन विल्यमसनने रॉस टेलरला मागे टाकत रचला इतिहास; शतक झळकावत न्यूझीलंडचा सावरला डाव

शुबमनला प्रतिक्षा करावी लागेल –

शुबमन गिलबद्दल गांगुली म्हणाला, “मला खात्री आहे की जेव्हा त्याची वेळ येईल, तेव्हा त्यालाही खूप संधी मिळतील. मला वाटते की निवडकर्ते, कर्णधार आणि प्रशिक्षक त्याच्याबद्दल विचार करतात. त्याला खूप उच्च दर्जाचे रेटिंग देतात. म्हणूनच तो एकदिवसीय आणि टी-२० खेळत आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. पण या क्षणी, कदाचित संघ व्यवस्थापनाचा संदेश असेल की त्याला प्रतीक्षा करावी लागेल.”