scorecardresearch

Premium

Asia Cup 2023: पाकिस्तानचा संघ सध्या मजबूत, पण अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध…, बाबरच्या टीमला सौरव गांगुलीचे आव्हान

Sourav Ganguly’s statement: पाकिस्तानचा संघ कितीही बलाढय़ झाला, तरी भारतात आणि अहमदाबादच्या मैदानावर भारताला आव्हान देणे कठीण जाईल, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.

Sourav Ganguly's statement on India-Pak match
पाकिस्तान टीम आणि सौरव गांगुली (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Sourav Ganguly’s statement on India-Pak match: येत्या दोन महिन्यांत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावर अनेक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. त्याची सुरुवात २ सप्टेंबरपासून आशिया चषकाने होत आहे. आशिया चषक स्पर्धेत गट स्तरावर चकमक झाल्यानंतर दोन्ही संघ भविष्यात एकमेकांविरुद्ध खेळतील आणि जरी दोघेही आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचले नाहीत, तर १४ ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची सर्वांना प्रतीक्षा असेल.

पाकिस्तान संघ आता मजबूत आहे –

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानला इशारा दिला आहे. गांगुलीने रेव्हस्पोर्ट्शी केलेल्या संभाषणात म्हटले आहे की, पाकिस्तान संघ आता पूर्वीसारखा संघ राहिलेला नाही. माझ्या वेळी भारतीय संघाची पाकिस्तानविरुद्धची आकडेवारी अगदी बरोबर होती, पण गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचा संघ खूप मजबूत संघ बनला आहे. गेल्या वर्षीच त्यांनी आम्हाला टी-२० विश्वचषकात हरवले होते. पाकिस्तान संघ आता भारताला स्पर्धा देत आहे.

Pakistan Team In India ICC World Cup 2023 Shadab Khan Praise Kuldeep Yadav Rohit Sharma Says Our Fats Weight Might Increase
पाकिस्तानी संघाची भारतात चंगळ! पण शादाब खानने व्यक्त केली चिंता, म्हणाला, “आमचे फॅट्स वाढून..”
Asian Games 2023: After squash India defeated Pakistan in hockey also defeated Pakistan 10-2 in a one-sided match
Asian Games, IND vs PAK Hockey: लहरा दो…! टीम इंडियापुढे पाकिस्तानने टेकले गुडघे, एकतर्फी सामन्यात १०-२ने भारताचा ऐतिहासिक विजय
india to face pakistan in davis cup again
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी सामना; त्रयस्थ केंद्रावर खेळण्यास पाकिस्तानचा ठाम नकार
Irfan Pathan's Post on X
IND vs PAK: ‘लगता है पड़ोसियों ने टीवी के साथ-साथ मोबाईल भी…’; भारताच्या विजयानंतर इरफान पठाणने पाकिस्तानींना केले ट्रोल

दुबईच्या पराभवानंतर परिस्थिती बदलली-

या संवादात सौरव गांगुली पुढे म्हणाला की, “मी जेव्हा पाकिस्तानविरुद्ध खेळायचो, तेव्हा आमचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड चांगला होता. मी भारत-पाकिस्तान सामना कधीही दबाव म्हणून घेतला नाही. हा सामना मी नेहमी सामान्य सामना म्हणून खेळलो. आपण फक्त मर्यादित षटकांतील क्रिकेट किंवा कसोटी क्रिकेटविरुद्ध क्रिकेट खेळतो या मानसिकतेने मी खेळायचो.” गांगुली पुढे म्हणाला की, गेल्या वर्षी दुबईत पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर परिस्थिती बदलली असून आता पाकिस्तानी संघात भारताला पराभूत करण्याची ताकद आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023 स्पर्धेतील संघांच्या जर्सीवरुन यजमानाचे नाव गायब, पाकिस्तानचा माजी कर्णधार पीसीबी आणि एसीसीवर संतापला

भारताला भारतात हरवणे कठीण –

माजी कर्णधार म्हणाला की, “पाकिस्तानी संघ खूप चांगला आहे. पाकिस्तानातून क्रिकेटमध्ये अनेक आश्चर्यकारक खेळाडू उदयास आले हे आश्चर्यकारक आहे, परंतु पाकिस्तानी संघ कितीही बलाढ्य झाला तरी भारताला भारतात आणि अहमदाबादच्या मैदानावर आव्हान देणे कठीण होईल. टीम इंडियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करणं पाकिस्तानला खूप कठीण जाईल.” असं सौरव गांगुलीच्या मते, हे काम पाकिस्तान संघाला वाटते तितके सोपे नसेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sourav ganguly said it will be difficult for pakistan to beat india in ahmedabad in asia cup 2023 vbm

First published on: 01-09-2023 at 18:23 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×