भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दिग्गजांच्या दोन महत्त्वाच्या बैठका गुरुवारी दिल्लीत पार पडल्या. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी सचिव निरंजन शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नाही, मात्र मंडळाचे सचिव जय शहा हे नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. १९८३ च्या विश्वचषक चॅम्पियन संघातील सदस्यांपैकी एक, रॉजर बिन्नी आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला, जे कर्नाटकचे आहेत, ते अध्यक्ष, सचिव किंवा आयपीएल चेअरमन होऊ शकतात. विद्यमान खजिनदार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण हे त्याच पदासाठी पुन्हा उमेदवारी देऊ शकतात. बीसीसीआयच्या एजीएममध्ये कर्नाटक राज्याकडून सचिव संतोष मेनन सहभागी होत होते. 

हेही वाचा :  Ind vs Pak Women’s T20 Asia Cup: पाकिस्तानने रोखला भारताचा विजयरथ, १३ धावांनी केला पराभव 

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे रोहन जेटली, ओडिशा क्रिकेट असोसिएशनचे संजय बेहरा, हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे अनिरुद्ध चौधरी यांच्या नावांची अन्य पदांसाठी चर्चा होती. सध्याचे सहसचिव जयेश जॉर्ज आणि आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल हेही पुढील निवडणूक लढवणार नाहीत.

रॉजर बिन्नी नवे अध्यक्ष होऊ शकतात

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. यात अविशेक दालमिया यांचेही नाव नाही. ते बीसीसीआयमधील पदाचे दावेदार असल्याचे मानले जात होते. एजीएममध्ये सौरव गांगुली क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल चे प्रतिनिधी बनल्याने, आता हे स्पष्ट झाले आहे की बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचा मुलगा बोर्डाच्या पुढील व्यवस्थेचा भाग असणार नाही.