Premium

World Cup 2023: विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! कर्णधार टेंबा बावुमा परतला मायदेशी, जाणून घ्या कारण

Temba Bavuma Returns to South Africa: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा विश्वचषकाच्या सराव सामन्यापूर्वी मायदेशी परतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.

Temba Bavuma Returns to South Africa
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ (फोटो-प्रोटीज मेन्स ट्विटर)

South Africa captain Temba Bavuma returned home ahead of warm up matches: विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा मायदेशी परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कौटुंबिक कारणांमुळे टेंबा बावुमाला घरी परतावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा संघ अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका संघ अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड अनुक्रमे २९ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी सराव सामने खेळणार आहेत. टेंबा बावुमा या दोन्ही सामन्यात खेळू शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेंबा बावुमा भारतात कधी परतणार?

त्याच वेळी, ४ ऑक्टोबर रोजी विश्वचषक २०२३ चा उद्घाटन सोहळा होणार आहे. तोपर्यंत टेंबा बावुमा भारतात परतेल, असा विश्वास आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील सामना ७ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर १२ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा दुसरा विश्वचषक सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टेंबा बावुमाच्या अनुपस्थितीत एडन मार्कराम संघाचे नेतृत्व करेल.

या संघांविरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषकात होणार सामना –

दक्षिण आफ्रिका तिसरा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचे संघ २१ ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरेल.

हेही वाचा – IND vs AUS ODI Series: रोहित शर्माने मालिका विजयाची ट्रॉफी के एल राहुलकडे देत जिंकली चाहत्यांची मनं, पाहा VIDEO

बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाची अलीकडची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी झाली आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मायदेशात ३-२ अशी एकदिवसीय मालिका जिंकून अलीकडेच ते पुनरागमन करत आहेत. त्यामुळे आफ्रिकन संघाचे मनोबल उंचावेल.

हेही वाचा – शिखर धवनने चेतेश्वर पुजाराची घेतली मजा! इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या ‘VIDEO’वर केली मजेशीर कमेंट

विश्वचषक २०२३ साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ –

टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को जॅन्सेन, अँडिले फेहलुकवायो, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी, लिझार्ड विल्यम्स

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: South africa captain temba bavuma returned home ahead of warm up matches against afg and nz in world cup 2023 vbm

First published on: 28-09-2023 at 14:03 IST
Next Story
शिखर धवनने चेतेश्वर पुजाराची घेतली मजा! इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या ‘VIDEO’वर केली मजेशीर कमेंट