‘ओमायक्रॉन’चा भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही!

आफ्रिका क्रिकेट मंडळ जैव-सुरक्षित परिघाची उभारणी करून दोन्ही संघांतील खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेईल,

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आशावादी

जोहान्सबर्ग : ‘ओमायक्रॉन’ या करोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तनामुळे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असा आशावाद आफ्रिकेचे अनुक्रमे कसोटी आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारे डीन एल्गर आणि तेम्बा बव्हुमा यांनी व्यक्त केला आहे. 

आफ्रिका क्रिकेट मंडळ जैव-सुरक्षित परिघाची उभारणी करून दोन्ही संघांतील खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेईल, असेही मत दोन्ही कर्णधारांनी मांडले. भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. उभय संघांतील पहिल्या कसोटीला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका खेळवण्यात येईल. ‘बीसीसीआय’ने या दौऱ्याला हिरवा कंदील दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: South africa players express full confidence in india tour zws