दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारताचा कर्णधार केएल राहुल खूपच निराश झाला आहे. जोहान्सबर्ग येथील मैदानावर गुरुवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला सात गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या मैदानावर २९ वर्षांनंतर भारताचा कसोटी क्रिकेटमधील हा पहिला पराभव आहे. पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने प्रतिक्रिया दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात आणखी ६०-७० धावा करायला हव्या होत्या, असे केएल राहुललने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संघाची कुठे चुक झाली हे राहुललने सामन्यानंतर सांगितले आहे. “नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही पहिल्या डावात मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलो. आम्ही किमान ६०-७० धावा करायला हव्या होत्या. आम्हाला वाटले की १२२ धावा करणे सोपे नाही. आम्ही जास्त धावा करून त्यांच्यावर दबाव आणायला हवा होता. आम्ही येथे काही खास करू शकतो, असा विश्वास संघाला वाटत होता. खेळपट्टीवर फलंदाजी करणेही अवघड होते, पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूरसाठी हा एक उत्तम कसोटी सामना होता. त्याने आपल्या कामगिरीने आपल्याला खूप प्रभावित केले आहे. त्याने फलंदाजीतलही महत्त्वपूर्ण योगदान दिले,” असे केएल राहुलने सामन्यानंतर म्हटले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa vs india 2nd test skipper kl rahul explains reason behind india defeat against south africa abn
First published on: 07-01-2022 at 07:59 IST