Three South African players arrested in match fixing case : दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट सट्टेबाजीचा आणखी एक काळा अध्याय उघडकीस आला आहे. द हॉक्स, तेथील गुन्हेगारी तपास एजन्सी, २०१५/२०१६ देशांतर्गत टी-२० राम स्लॅम चॅलेंज दरम्यान मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल तीन माजी क्रिकेटपटूंना अटक केली आहे. ज्यामध्ये अथी म्बालाथी (४३), थामी सोलेकिल (४४) आणि लोनवाबो त्सोत्सोबे (४०) हे तीन खेळाडू आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला तिघांनाही स्वतंत्रपणे अटक करण्यात आली होती.

एका माहितीदाराने आरोप केल्यानंतर हॉक्सने २०१६ मध्ये तपास सुरू केला. तपासादरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू गुलाम बोदी याने अनेक खेळाडूंशी संपर्क साधून तीन स्थानिक टी-२० सामन्यांच्या निकालांवर प्रभाव टाकण्यास सांगितले असल्याचे समोर आले. हॉक्सचे प्रवक्ते कर्नल कटलेगो मोगले यांनी पुष्टी केली की म्बलती आधीच प्रिटोरिया विशेष व्यावसायिक गुन्हे न्यायालयात हजर झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

पाच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले –

मोगले यांच्या हवाल्याने द सिटिझनने म्हटले आहे की “सोलेकिल आणि त्सोत्सोबे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, २००४ (PRECCA) च्या कलम १५ अंतर्गत भ्रष्टाचाराचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते दोघेही २९ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रिटोरिया विशेष व्यावसायिक गुन्हे न्यायालयात हजर होतील.” जेथे त्याचे प्रकरण उघड करण्यासाठी २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आले.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला सर्वात मोठा धक्का, ‘हा’ मुख्य खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर; बदली खेळाडूची घोषणा

U

बोदीला २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती –

२०१६ मध्ये मॅच-फिक्सिंगच्या आरोपांवरील प्राथमिक तपास उघडकीस आला, जेव्हा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या भ्रष्टाचार विरोधी अधिकाऱ्याने माजी प्रिटोरिया खेळाडू गुलाम बोदी यांचा समावेश असलेल्या संशयास्पद बाबींची नोंद केली. कर्नल मोगले यांच्या म्हणण्यानुसार, बोदीने तीन स्थानिक टी-२० सामन्यांच्या निकालांमध्ये फेरफार करण्यासाठी अनेक खेळाडूंशी संपर्क साधल्याचे पुरावे तपासात मिळाले आहेत. तो भारतातील सट्टेबाजांशी जवळून काम करत होता. बोदीला नंतर जुलै २०१८ मध्ये अटक करण्यात आली आणि त्याला भ्रष्टाचाराच्या आठ गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले. ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

हेही वाचा – ECB : ECB चा पाकिस्तानला दणका, PSL मध्ये खेळण्यावर इंग्लिश खेळाडूंवर घातली बंदी; IPL बाबत काय आहे भूमिका?

या तीन खेळाडूंची कारकीर्द –

मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकलेल्या तीन क्रिकेटपटूंबद्दल सांगायचे तर, दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संघात फक्त लोनवाबो त्सोत्सोबेच स्थान मिळवू शकले. अथी म्बलाथी आणि थामी त्सोलेकिले हे फक्त प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए क्रिकेट खेळू शकले. त्सोत्सोबेने आफ्रिकन संघासाठी ५ कसोटी (९ विकेट), ६१ एकदिवसीय (९४ विकेट) आणि २३ टी-२० (१८ विकेट) सामने खेळले आहेत. २०१४ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्याने शेवटचा सामना खेळला होता. त्सोत्सोबेने भारताविरुद्ध ३ कसोटी आणि १० एकदिवसीय सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. त्याला एका टी-२० सामन्यात यश मिळाले नाही. एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डुप्लेसिस यांसारख्या दिग्गज दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंसोबत सोत्सोबे खेळला आहे.

Story img Loader