दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर एक डाव आणि ६३ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली.

MP allrounder Anshula Rao suspended for four years for failing dope test
क्रिकेट

विंडीज-आफ्रिका कसोटी मालिका

सेंट ल्युशिया : दक्षिण आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर एक डाव आणि ६३ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. नाबाद १४१ धावांची खेळी साकारणारा क्विंटन डीकॉक आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात ९७ धावांत गारद झाल्यानंतर आफ्रिकेने पहिल्या डावात ३२२ धावा उभारल्या. यात डीकॉकच्या शतकाव्यतिरिक्त एडिन मार्करामच्या ६० धावांचे योगदान होते. त्यानंतर कॅगिसो रबाडा (५/३४) आणि आनरिख नॉर्किए (३/४६) यांच्या भेदक माऱ्यापुढे विंडीजचा दुसरा डाव फक्त १६२ धावांत आटोपला. विंडीजकडून रोस्टन चेसने (६२) एकाकी झुंज दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: South africas resounding victory west indies africa test series quinton de kock ssh

ताज्या बातम्या