आक्रमक खेळाच्या जोरावर फुटबॉल विश्वात दिग्गज समजल्या जाणाऱ्या स्पेनने विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले आहे. स्पेनने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत अल्बेनियावर ३-० असा सहज विजय मिळवला.

स्पेनने पहिल्या सत्रातच हे तिन्ही गोल करत विश्वचषकासाठीची पात्रता पूर्ण केली. स्पेन विश्वचषकात पोहोचली असली तरी सर्बियाला मात्र अजूनही पात्रतेसाठी वाट पाहावी लागणार आहे. कारण सर्बियाला ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.

स्पेनकडून रॉड्रिगोने सामन्याच्या १६व्या मिनिटाला पहिला गोल करत संघाचे खाते  उघडले. इस्कोने २३व्या मिनिटाला स्पेनसाठी दुसरा गोल करत आघाडी अधिक बळकट केली. त्यानंतर फक्त तीन मिनिटांनीच थिआगो अल्कांटाराने तिसरा गोल केला.

सर्बिया आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये चांगलाच रंगतदार सामना झाला. पण अखेर ऑस्ट्रियाने सर्बियावर या सामन्यात ३-२ अशी मात केली.

आइसलँडचा  विजय

आइसलँडने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत टर्कीवर ३-० असा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने ठोस पाऊल टाकले आहे.

क्रोएशिया-फिनलँड बरोबरी

विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीतील क्रोएशिया-फिनलँड हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला. हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे ‘आय’ गटामध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे.

* आइसलँडचा टर्कीवर विजय

आइसलँडने विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत टर्कीवर ३-० असा विजय मिळवला. या विजयासह त्यांनी विश्वचषक पात्रतेच्या दृष्टीने ठोस पाऊल टाकले आहे.

* अमेरिकेकडून पनामाचा धुव्वा

ओरलँडो : ख्रिस्तियन पुलिसीकने दिलेल्या झकास सुरुवातीच्या जोरावर अमेरिकेने पनामा संघाचा विश्वचषक फुटबॉल पात्रता स्पर्धेत ४-० असा धुव्वा उडवला. ख्रिस्तियननंतर जोझी अल्टीडोरने अमेरिकेसाठी दुसरा गोल केला. त्यानंतर पेनेल्टी कीकच्या जोरावर अमेरिकेने आपली आघाडी ३-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात बॉबी वूडने केलेल्या गोलच्या जोरावर अमेरिकेने विजयावर ४-० असे शिक्कामोर्तब केले.

* क्रोएशिया-फिनलँड बरोबरीत

विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीतील क्रोएशिया-फिनलँड हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला. हा सामना बरोबरीत सुटल्यामुळे ‘आय’ गटामध्ये चांगलीच चुरस रंगणार आहे.

* युक्रेनने कोसोव्होला नमवले

कोसोव्होवर २-० असा सहज विजय मिळवत युक्रेनने ‘आय’ गटामध्ये आपली दावेदारी अधिक बळकट केली आहे. या विजयानंतर युक्रेन आणि क्रोएशिया यांचे प्रत्येकी १७ गुण झाले आहेत.