scorecardresearch

Premium

Kissing Controversy: जेनी हर्मोसोला किस करणे लुईस रुबियल्सला पडले महागात, फिफाने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण?

FIFA Suspends Luis Rubiales: अंतिम सामन्यानंतर जेनी हर्मोजचे चुंबन घेतल्याबद्दल आणि आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यामुळे स्पॅनिश फुटबॉल अध्यक्ष लुईस रुबियल्स यांना फिफाने निलंबित केले आहे.

Jenny Hermoso Kissing Luis Rubiales Controversy
जेनी हर्मोसो आणि लुईस रुबियल्स (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Jenny Hermoso Kissing Luis Rubiales Controversy: जागतिक फुटबॉल संघटना फिफाने स्पॅनिश फेडरेशनचे अध्यक्ष लुईस रुबियल्स यांना ९० दिवसांसाठी निलंबित केले आहे. फिफा महिला विश्वचषक फायनल दरम्यान स्पॅनिश खेळाडू जेनी हर्मोसोसोबत झालेल्या कथित चुंबनाच्या घटनेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. फिफाची शिस्तपालन समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि तोपर्यंत रुबियल्स फेडरेशनच्या कोणत्याही उपक्रमात भाग घेऊ शकणार नाहीत.

फिफा फायनलमध्ये पुरस्कार सोहळ्यादरम्यान रुबियल्स हर्मोसोचे चुंबन घेताना दिसला होता. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. स्पेनच्या पंतप्रधानांनीही या घटनेची दखल घेतली आणि रुबियालेसची माफी पुरेशी नाही असा आग्रह धरला. हर्मोसोने आधीच सांगितले होते की, तिने स्पॅनिश एफएच्या अध्यक्षांला बन घेण्यास संमती दिली नव्हती. परंतु रुबियल्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. कारण त्याचे म्हणने आहे की, आपण कोणतीही सीमा ओलांडली नाही.

hansie cronje & bob woolmer
World Cup Cricket: मॅच सुरू असताना कोच-कॅप्टन यांच्यात इअरपीसद्वारे गुजगोष्टी; सामनाधिकाऱ्यांची कारवाई
IND vs AUS: KL Rahul slams fitness questioners Said wicketkeeping is getting better in last few matches
KL Rahul: फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना राहुलभाईचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “गेल्या काही सामन्यांत…”
joe biden narendra modi canada prime minister justin trudeau
मोदींना जी २० परिषदेतच बायडेन यांनी कॅनडाच्या आरोपांबाबत सांगितलं होतं? नव्या दाव्याची चर्चा!
gaur-gopal-das-piyush
गौर गोपाल दास यांना दीक्षा घेण्याआधी आवरता आला नाही ‘पीयूष’ प्यायचा मोह; जाणून घ्या ‘पीयूष’ या पेयाचा इतिहास

रुबियल्स काय म्हणाले?

स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचे लुईस रुबियल्स यांनी सांगितले. याआधी मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की, लुईस शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. रुबियाल्सने सोमवारी या घटनेबद्दल माफी मागितली, परंतु राजीनामा देण्यास नकार दिला.

हेही वाचा – Asia Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाचा मोठा निर्णय! आशिया कपसाठीच्या मुख्य संघात केला ‘हा’ बदल

विश्वचषक विजेत्या स्पॅनिश राष्ट्रीय संघाने तसेच इतर अनेक खेळाडूंनी सांगितले आहे की, लुईस रुबियल्स महासंघाचे प्रमुख असताना, ते आंतरराष्ट्रीय सामने खेळणार नाहीत. दुसरीकडे, आरएफईफ आणि यूईएफए लुईस यांना शनिवारी फिफाच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत अन्य कोणतीही माहिती उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.

हेही वाचा – रनआऊट झाल्यानंतर बॅट्समनला राग आला, अन् केलं असं काही की VIDEO होतोय व्हायरल

रुबियल्स म्हणाले, “मी माझ्या आदर्शाचे रक्षण करण्यासाठी बदनाम होण्यास तयार आहे. मला होत असलेल्या या छळाला मी पात्र नाही. त्यावेळी जे काही घडले त्याबद्दल मला न डगमगता माफी मागायची आहे. जेनीनेच मला पहिले उचलले. मी तिला पेनल्टीबद्दल विसरून सांगितले आणि मी तिला चुंबन विचारले आणि ती म्हणाली ठीक आहे. चुंबन सहमतीने केले होते. अनेक लोक मला पाठिंबा देत आहेत, तर अनेकजण विरोधातही आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Spanish football president luis rubiales has been suspended by fifa for 90 days after kissing jenny hermoso vbm

First published on: 27-08-2023 at 10:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×