भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेच्या चौथ्या सामन्यात ४२ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या तीन महत्वाच्या खेळाडूंना तंबूत धाडणारा भारताचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शामीने परिस्थिती पाहून गोलंदाजी करणे महत्वाचे असते असे म्हटले. तसेच मी या सामन्यात केवळ गोलंदाजीच्या प्राथमिकतेवर भर दिला काही नवीन करण्याचा प्रयत्न केला नाही. असेही शमी म्हणाला.
रांची येथे खेळविण्यात आलेला हा चौथा एकदिवसीय सामना वरूणराजाच्या राजाच्या आगमनामुळे रद्द करण्यात आला. जॉर्ज बेली आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या शानदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे २९६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. भारतीय संघाने ४ षटकांत बिनबाद २७ अशी सुरुवात करत या लक्ष्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. परंतु, ऐनवेळी पावसाने खो घातला.
शामी म्हणाला, “मी जेव्हा मैदानात जातो तेव्हा कोणत्याही दबावाखाली मी खेळत नाही. मी नेहमी स्वत:वर विश्वास ठेवतो. त्यानुसार गोलंदाजीच्या ‘लाईन आणि लेन्थ’कडे माझे लक्ष असते. मी फक्त प्रत्येकवेळी उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करतो.” असेही शामी म्हणाला.