नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकनंतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार यश मिळवण्याच्या इराद्याने गुरुवारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मिशन ऑलिम्पिक समितीमध्ये माजी नेमबाज अंजली भागवत, माजी बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, माजी हॉकीपटू वीरेन रस्किन्हा आणि माजी टेबल टेनिसपटू मोनालिसा मेहता यांच्यासह सात जणांचा समावेश केला आह़े मिशन ऑलिम्पिक समिती लक्ष्य ऑलिम्पिक व्यासपीठ योजनेअंतर्गत (टॉप्स) भारतीय ऑलिम्पिकपटूंच्या तयारीसाठी आर्थिक मदत करते. माजी फुटबॉलपटू बायच्युंग भूतिया, माजी लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज आणि माजी हॉकी कर्णधार सरदार सिंग या अन्य तिघांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आह़े. यंदा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी सात पदकांची कमाई केली. यानंतर पॅरालिम्पिक स्पध्रेत १९ पदकांची लयलूट केली़