Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएल २०२६ स्पर्धेतील एलिमिनेटचा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने ९७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २० षटकांअखेर २४३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबाद संघाचा डाव १९६ धावांवर आटोपला. यासह राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना ४७ धावांनी आपल्या नावावर केला. यासह राजस्थान रॉयल्सने क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे.
SRH vs RR Eliminator Highlights: सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे हायलाईट्स
SRH vs RR: राजस्थानची दुसऱ्या क्वालिफायरमध्ये धडक! हैदराबादवर मिळवला दणदणीत विजय; वैभव सूर्यवंशी-जोफ्रा आर्चर ठरले गेमचेंजर
SRH vs RR Live: सनरायझर्स हैदराबादला लागोपाठ २ धक्के! रेड्डीनंतर कमिन्सही परतला माघारी
सनरायझर्स हैदराबादला लागोपाठ २ धक्का बसले आहेत. नितीश रेड्डी ३८ धावांवर माघारी परतल्यानंतर पॅट कमिन्स १ धाव करून माघारी परतला आहे.
SRH vs RR: "सर्वात खास गोष्ट म्हणजे तो…", वैभव सूर्यवंशीची खेळी पाहून सचिन तेंडुलकर भारावला; ४ वाक्यात सांगितलं सूर्यवंशीच्या यशाचं सीक्रेट
क्लासेन बाद, हैदराबादचा निम्मा संघ तंबूत
राजस्थानने दिलेल्या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना हैदराबादची दाणादाण उडाली असून, त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
आर्चर सुसाट, हेडही बाद
जोफ्रा आर्चरच्या प्रचंड वेगासमोर ट्रॅव्हिस हेडने शरणागती पत्करली. आर्चरने त्याला त्रिफळाचीत केलं.
नांद्रे बर्गरला जोफ्रा आर्चरची साथ, स्मरण माघारी
नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीवर जोफ्रा आर्चरने रवीचंद्रन स्मरणचा अवघड झेल टिपला.
जोरदार फटकेबाजीनंतर इशान किशन बाद
राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण करणारा इशान किशन ३३ धावा करून तंबूत परतला. जोफ्रा आर्चरने त्याला बाद केलं. इशानने ११ चेंडूत ३३ धावा चोपल्या.
इशान-हेडची फटकेबाजी सुरू
अभिषेक शर्मा बाद झाल्याचा परिणाम होऊ न देता इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यांनी जोरदार फटकेबाजी सुरू केली आहे.
SRH vs RR Live: अभिषेक शर्मा तंबूत
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना जोफ्रा आर्चरने अभिषेक शर्माला बाद करत राजस्थानला झटपट यश मिळवून दिलं.
SRH vs RR Live: वैभवची वेगवान सुरुवात, पण हैदराबादचं शेवटी दमदार पुनरागमन; SRHला विजयासाठी किती धावांची गरज?
या डावात वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीनंतर राजस्थान रॉयल्स मोठी धावसंख्या उभारणार असं चित्र होतं. पण त्यानंतर सनरायझर्स हैदराबच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं आणि राजस्थान रॉयल्सला २४३ धावांवर रोखलं. हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी २४४ धावा करायच्या आहेत.
SRH vs RR Live: राजस्थानला चौथा मोठा धक्का! रियान पराग परतला माघारी
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान पराग अवघ्या २६ धावा करुन माघारी परतला आहे.
SRH vs RR Live: राजस्थानला तिसरा मोठा धक्का! ध्रुव जुरेल परतला माघारी
राजस्थानला तिसरा धक्का बसला आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर ध्रुव जुरेल बाद होऊन माघारी परतला आहे.
SRH vs RR Live: राजस्थान रॉयल्सला दुसरा मोठा धक्का
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यशस्वी जैस्वाल २९ धावा करुन माघारी परतला आहे.
SRH vs RR Live: सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड अवघ्या ३ धावांनी हुकला! वैभव सूर्यवंशी ९७ धावांवर बाद
वैभव सूर्यवंशीकडे २९ चेंडूत सर्वात वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ९७ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. यासह ख्रिस गेलचा सर्वात वेगवान शतकाचा रेकॉर्ड थोडक्यात हुकला आहे.
SRH vs RR Live: पावरप्ले
पावरप्लेमध्ये वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासह राजस्थानने ६ षटकात ८० धावांचा पल्ला गाठला आहे.
SRH vs RR Live: 'युनिव्हर्स बेबी बॉस', वैभवने मोडला ख्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड
राजस्थान रॉयल्सकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने दमदार सुरुवात करुन दिली आहे. त्याने या सामन्यात ७ षटकार मारताच ख्रिस गेलचा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार खेचण्याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने ६० षटकार खेचले आहेत.
राजस्थान- हैदराबाद संघ असे आहेत
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनाव्हन फरेरा, दासून शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, यशराज पुंजा
इम्पॅक्ट प्लेयर्स- शुबम दुबे, सुशांत मिश्रा, अमनल परेरा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे
सनरायझर्स हैदराबाद
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिच क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, रवीचंद्रन स्मरण, पॅट कमिन्स, शिवांग कुमार, इशान मलिंगा, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे
इम्पॅक्ट प्लेयर्स: अनिकेत वर्मा, सलील अरोरा, लायम लिव्हिंगस्टोन, हर्ष दुबे आणि हर्षल पटेल</p>
सनरायझर्स हैदराबादने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय
एलिमिनेटरच्या महत्त्वपूर्ण लढतीत सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

SRH vs RR Eliminator Highlights: सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचे हायलाईट्स <br />.(फोटो- इंडियन एक्सप्रेस)
