Sri Lanka announces Test squad for first match against India: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला असून त्यांनी सराव सामनाही खेळला आहे. या कसोटी मालिकेती पहिला सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळवला जाईल. या पहिल्या सामन्यासाठी फार कमी वेळ उरला असतानाच, श्रीलंका संघाने आपल्या पहिल्या कसोटीसाठीचा संघ जाहीर केला आहे.
श्रीलंका संघाने सामना सुरू होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधीच आपल्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ आधीच गॉलमध्ये दाखल झाला असून त्यांनी तयारीला सुरूवात केली आहे. संघाचे कर्णधारपद धनंजय डी सिल्वा याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर याचबरोबर ३३ वर्षीय विकेटकीपर फलंदाजाला संधी देण्यात आली आहे. ज्याने कारकिर्दीत अद्याप अतही शतक झळकावलेलं नाही.
भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत दोन सामने असले, तरी सध्या केवळ पहिल्या कसोटीसाठीच संघाची घोषणा करण्यात आली आहे. संघातील काही खेळाडूंना दुखापतींचा सामना करावा लागत असल्यामुळेच ही घोषणा करण्यास विलंब झाल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, धनंजय डी सिल्वा संघाचे नेतृत्व करेल आणि कामिंदू मेंडिसची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघात फिरकीपटू प्रभात जयसूर्याचाही समावेश आहे, जो भारतीय फलंदाजांसाठी एक मोठं आव्हान ठरेल.
या संघातील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज निरोशन डिकवेल्ला याला पुन्हा संघात स्थान देण्यात आलं आहे तर तीन खेळाडूंना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली. श्रीलंकेसाठी या मालिकेत दोन महत्त्वाचे वरिष्ठ फलंदाज उपलब्ध नसतील. कुसल मेंडिस उजव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर आहे, तर पथुम निसांका मनगटावरील शस्त्रक्रियेनंतर सावरण्याच्या प्रक्रियेत आहे.
यष्टिरक्षक भूमिकेसाठी निवडकर्त्यांनी ३३ वर्षीय निरोशन डिकवेल्ला याला पुन्हा संघात घेतलं आहे. डिकवेल्लाने श्रीलंकेसाठी अखेरचा कसोटी सामना २०२३ मध्ये खेळला होता. गॉलच्या पारंपरिक फिरकीस पोषक खेळपट्टीवर भारताच्या मजबूत गोलंदाजीचा सामना करताना त्याचा अनुभव श्रीलंकेच्या फलंदाजीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. निरोशन डिकवेल्ला याने कसोटीत २०१४ मध्ये पदार्पण केलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकही कसोटी शतक झळकावलेलं नाही. त्याने ५४ कसोटी सामन्यांमधील ९६ डावांमध्ये २७५७ धावा केल्या आहेत.
याशिवाय, श्रीलंकेने तीन नव्या खेळाडूंना कसोटी संघात स्थान दिलं आहे. ऑफस्पिन गोलंदाजी करणारा अष्टपैलू केशरा नुवंथा, तसेच युवा फलंदाज पसिंदू सूर्याबंदारा आणि सोनल दिनुषा यांना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळाली आहे.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी श्रीलंकेचा संघ:
धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंदू मेंडिस (उपकर्णधार), दिनेश चंडीमल, पासिंदू सूर्याबंदारा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेल्ला (विकेटकीपर), नुस्तरा, मेनस्वार, रामबादरा, नुस्तूर मिलन रत्नायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नांडो, दिलशान मदुष्का.
