scorecardresearch

T20 WC: भारत-पाक सामन्यापूर्वी स्पर्धेला गालबोट; श्रीलंकेचा बॉलर बांगलादेशच्या बॅट्समनवर गेला धावून आणि मग….

श्रीलंका आणि बांगलादेशमधील सामन्यात खेळाडूं मैदानातच भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

T20 WC: भारत-पाक सामन्यापूर्वी स्पर्धेला गालबोट; श्रीलंकेचा बॉलर बांगलादेशच्या बॅट्समनवर गेला धावून आणि मग….
T20 WC: भारत-पाक सामन्यापूर्वी स्पर्धेला गालबोट; श्रीलंकेचा बॉलर बांगलादेशच्या बॅट्समनवर गेला धावून आणि मग….(Photo-AP)

श्रीलंका आणि बांगलादेशमधील सामन्यात खेळाडूं मैदानातच भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. श्रीलंकेचा गोलंदाज लाहिरू कुमारा आणि लिटन दास यांच्यात शाब्दिक चकमक झाली. बांगलादेश फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात ही घटना घडली.

कुमाराने सहाव्या षटकाचा पाचवा चेंडू टाकत लिटन दासला बाद केलं. तसेच त्याला काहीतरी बोलल्याने दासने त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. यावेळी नईम मध्यस्थीसाठी पुढे आला आणि कुमाराचा हात पकडला. या दरम्यान मैदानातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर श्रीलंकेच्या अन्य खेळाडूंनी पुढे येत प्रकरण मिटवलं. त्यानंतर सामन्याला पुन्हा सुरुवात झाली. बांगलादेशला लिटन दासच्या रुपाने पहिला धक्का बसला. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर फटका मारल्यानंतर दासुन शनाकाने त्याचा झेल घेतला. १६ चेंडूत १६ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला शाकिब अल हसनही मैदानावर जास्त काळ तग धरू शकला नाही. ७ चेंडूत १० धावा करून बाद झाला. चमिकाच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. मोहम्मद नईमच्या अर्धशतकी खेळीमुळे बांगलादेशला धावसंख्या उभारण्यास मदत झाली. मोहम्मदने ५२ चेंडूत ६२ धावा केल्या. या खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. बिनुरा फर्नांडोने त्याच्या गोलंदाजीवरच मोहम्मदचा झेल घेतला. नईमनंतर मुशफिकुर रहिमने अर्धशतकी खेळी केली. रहिमने ३७ चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या.

बांगलादेशनं ४ गडी गमवून १७१ धावा केल्या आणि श्रीलंकेला विजयासाटी १७२ धावांचं आव्हान दिलं आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी पात्रता फेरीत चांगली कामगिरी करत सुपर १२ फेरीत स्थान मिळवलं आहे. बांगलादेशच्या संघाकडे उलटफेर करणारा संघ म्हणून पाहिलं जातं.

श्रीलंका : दसुन शनका (कर्णधार), कुशल परेरा, पथुम निस्सांका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, दुश्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, बिनुरा फर्नांडो

बांगलादेश : मोहम्मद नईम, लिटन दास, शाकिब अल हसन, मुशफिकूर रहिम, मोहम्मद महमदुल्ला (कर्णधार), अफिफ होसेन, नुरुल हसन, मेहेदी हसन, नसुम अहमद,मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रहमान

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 17:44 IST

संबंधित बातम्या