श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. आज मंगळवारी कोलंबोमध्ये दोन्ही संघात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. यजमान श्रीलंकेसाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना मंगळवारी २७ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठे होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल.ॉ

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२०सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग आपण सोनी लिव्हवर पाहू शकतो.

हेही वाचा –Tokyo 2020: भारतीय महिला बॉक्सर लोव्हलिना उपांत्यपूर्व फेरीत धडक

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.