श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळवला जात असताना एक धक्कादायक घटना समोर आली. सामना सुरु असतानाच श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुशल मेडिंसच्या छातीत दुखायला लागल्यामुळे काही काळासाठी सामना थांबवून त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. क्षेत्ररक्षण करत असताना त्याला हा त्रास सुरु झाला. त्यानंतर २३ वे षटक सुरु असताना त्याने मैदान सोडले.

हेही वाचा >>> फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : थिम पहिल्याच फेरीत पराभूत ; दिमित्रोव्ह, स्टिफन्सची आगेकूच

मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामाना खेळवला जातोय. हा सामना सुरु असताना श्रीलंकन खेळाडू कुशल मेंडिसला स्लीपवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मात्र २३ वे षटक सुरु असताना त्याच्या छातीत अचानकपणे दुखायला लागले. त्यानंतर काही काळासाठी सामना थांबवून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेंडीसच्या आजाराबाबत सांगताना त्याच्या स्नायुंमध्ये दुखत असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली.

हेही वाचा >>> उमरान मलिकने टाकलेला चेंडू पोटाला लागला, दुखापतीमुळे मयंक अग्रवाल थेट जमिनीवरच झोपला

दरम्यान, बांगलादेश आणि श्रिलंका यांच्यात बांगलादेशमध्ये यांच्यात शेर ए बांगला मैदानावर दुसरा तसेच शेवटचा कसोटी सामना खेळवला जातोय. हा सामना सुरु होण्याआधी बांगलादेश संघाचा कर्णधार मनिपूल हकने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.