scorecardresearch

IND vs AUS 1st Test: श्रीकर भरतने मार्नस लाबुशेनच्या धोनी स्टाईलने उडवल्या बेल्स, पाहा VIDEO

IND vs AUS 1st Test Update: बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ८४ धावसंख्येवर ४ गडी गमावले आहेत.

IND vs AUS 1st Test Update Srikar Bharat's brilliant stumping to Marnus Labuschagne
श्रीकर भरत (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जो त्यांच्या अंगलटी येताना दिसत आहे. कारण ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या डावात ८४ धावा करताना ४ गडी गमावले. ज्यापैकी मार्नस लाबुशेनला यष्टीरक्षक श्रीकर भरतने शानदार पद्धतीने बाद केले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. संघाने पहिल्या तीन षटकांतच उस्मान ख्वाज आणि डेव्हिड वार्नरला गमावले. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्मिथने तिसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी यष्टीरक्षक श्रीकर भरतने मार्नस लाबुशेनला चपळाईने यष्टीरक्षण करत बाद केले. ज्यामुळे त्याचे फक्त एका धावेने अर्धशतक हुकले.

दरम्यान मॅट रेनशॉ फलंदाजीला आता होता, ज्याला रवींद्र जडेजाने भोपळही फोडू दिला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३६ षटकानंतर ४ बाद ८४ झाली आहे. तत्पुर्वी डेव्हिड वार्नर आणि उस्मान ख्वाजा प्रत्येकी १ धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया मोठा धक्का बसला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेत भारताला दमदार सुरुवात करुन दिली होती.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: टप्पा पडताच शमीचा चेंडू घुसला थेट स्टंपमध्ये, डेव्हिड वॉर्नरही झाला अवाक, पाहा VIDEO

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 13:15 IST