scorecardresearch

Premium

Asia Cup 2023 : श्रीलंकेसह ‘या’ तीन देशांनी ‘हायब्रिड मॉडेल’ला केली मनाई! दबाव वाढल्याने पाकिस्तानकडे असणार ‘हे’ दोन पर्याय

एशिया कप २०२३ बाबत वादविवाद सुरु असून दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात या टूर्नामेंटचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होतं. पण…

Pakistans Hybrid Model For Asia Cup 2023
पाकिस्तानच्या हायब्रिड मॉडेलला नाकारलं. (Image-Indian Express)

Pakistan’s Hybrid Model Rejected : एशिया कप २०२३ बाबत वादविवाद सुरु असून दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात या टूर्नामेंटचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होतं. परंत, पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून बीसीसीआयने स्पष्ट भूमिका मांडली होती. जर एशिया कपचं आयोजन पाकिस्तानमध्ये झालं, तर भारत कोणत्याही परिस्थितीत एशिया कपमध्ये सहभागी होणार नाही, असं बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितलं होतं. भारत पाकिस्तानच्या बाहेर सर्व सामने खेळू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

हायब्रिड मॉडेलला या तीन देशांनी नाकारलं

हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून एशिया कप २०२३ चं आयोजन करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला होता. पण श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तानने हा प्रस्ताव नाकारला. हायब्रिड मॉडेलला नकार दिल्यानंतर पाकिस्तान सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एशिया कपमधून बाहेर पडू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांच्या प्रस्तावानुसार, हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून पाकिस्तानला एशिया कपचे तीन किंवा चार सामने विदेशात करायचे होते. तर भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवू शकले असते.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

नक्की वाचा – कोण जिंकणार WTC फायनल? भारत-ऑस्ट्रेलियाबाबत ‘या’ दिग्गज खेळाडूने केला दावा, म्हणाला, “टीम इंडियाला खूप कठीण..”

तिन्ही देशांनी केलं बीसीसीआयचं समर्थन

श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तान या तिन्ही देशांनी एशिया कपचं आयोजन पाकिस्तानच्या बाहेर करण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाचं समर्थन केलं आहे. या प्रकरणाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, एशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) चे कार्यकारी बोर्डचे सदस्य वर्च्युअल किंवा सदस्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करेल. पीसीबीला आता माहितय की, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तान एशिया कपसाठी त्यांच्या हायब्रिड मॉडेलच्या प्रस्तावाचं समर्थन करत नाहीय.

पाकिस्तानकडे आहोत दोन विकल्प

एसीसीच्या सूत्रांनी म्हटलं की, पाकिस्तानकडे फक्त दोन विकल्प आहेत. टूर्नामेंटला तटस्थ ठिकाणी खेळवायचं किंवा टूर्नामेंटमधून बाहेर पडायचं. जर पाकिस्तान खेळला नाही, तरीही याला एशिया कप म्हटलं जाईल. परंतु, पाकिस्तानच्या अनुपस्थित पुन्हा एकदा याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सामने न झाल्यास प्रसारणकर्त्यांचे आर्थिक गणित चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा एशिया कप रद्द होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-06-2023 at 14:27 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×