Pakistan’s Hybrid Model Rejected : एशिया कप २०२३ बाबत वादविवाद सुरु असून दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात या टूर्नामेंटचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होतं. परंत, पाकिस्तानमधील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून बीसीसीआयने स्पष्ट भूमिका मांडली होती. जर एशिया कपचं आयोजन पाकिस्तानमध्ये झालं, तर भारत कोणत्याही परिस्थितीत एशिया कपमध्ये सहभागी होणार नाही, असं बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितलं होतं. भारत पाकिस्तानच्या बाहेर सर्व सामने खेळू शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हायब्रिड मॉडेलला या तीन देशांनी नाकारलं

हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून एशिया कप २०२३ चं आयोजन करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला होता. पण श्रीलंका, बांगलादेश आणि अफगानिस्तानने हा प्रस्ताव नाकारला. हायब्रिड मॉडेलला नकार दिल्यानंतर पाकिस्तान सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एशिया कपमधून बाहेर पडू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजम सेठी यांच्या प्रस्तावानुसार, हायब्रिड मॉडेलच्या माध्यमातून पाकिस्तानला एशिया कपचे तीन किंवा चार सामने विदेशात करायचे होते. तर भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवू शकले असते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Srilanka afghanistan and bangladesh rejected pakistans hybrid model of asia cup 2023 pressure increases on pcb ind vs pakistan nss
First published on: 06-06-2023 at 14:27 IST