श्रीनिवासन आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत -अब्दी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने ते आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत,

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागल्याने ते आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत, असे राजस्थानचे प्रतिनिधी मोहम्मद अब्दी यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले असले तरी आपणच आयसीसीच्या बैठकीला जाणार, अशी खुमखुमी श्रीनिवासन मिरवत होते.
अब्दी यांनी श्रीनिवासन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी आयपीएलमधील फिक्सिंगबाबत आरोप केले होते. ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवासन हे बीसीसीआयकडून आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहू शकत नाहीत. सध्या ते बीसीसीआयचे अध्यक्ष नाहीत, त्याचबरोबर इंडिया सीमेंट्स कंपनीशी निगडित व्यक्ती बीसीसीआयमध्ये कार्यरत राहू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आयसीसीच्या बैठकीला  श्रीनिवासन जाऊ शकत नाहीत,’’ असे अब्दी यांनी सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Srinivasan cant attend icc meetings abdi