राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा : ठाण्याच्या शुभाला जेतेपद

मुलींच्या १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित तनिशा कोटेचाने जेतेपद मिळवले.

मुंबई : ठाण्याच्या शुभा भटने डॉ. रमेश यशवंत प्रभू स्मृती महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मुलींच्या २१ वर्षांखालील गटाचे विजेतेपद मिळवले.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत बिगरमानांकित शुभाने चौथ्या मानांकित अनन्या चांदेला हिला ४—३ (४—११, ४—११, ११—७, ८—११, १३—११, ११—८, १३—११) असे रोमहर्षक लढतीत नमवले. पहिले दोन गेम गमावूनही शुभाने दडपणाखाली झोकात पुनरागमन करताना अखेरच्या तीन गेममध्ये सरशी साधली. त्यापूर्वी उपांत्य फेरीत तिने मेघना करंदीकरवर ४—० (१२—१०, ११—४, ११—७, ११—८) असा विजय मिळवून जेतेपदाच्या लढतीतील स्थान पक्के केले होते.

मुलींच्या १७ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित तनिशा कोटेचाने जेतेपद मिळवले. तनिशाने श्रावणी सावंतला ४—१ (११—५, ११—९, ५—११, ११—३, ११—६) अशी धूळ चारली. १९ वर्षांखालील गटाच्या अंतिम लढतीत दुसऱ्या मानांकित सायली वाणीने अजिंक्यपद मिळवले. जेनिफर वर्गीसवर ४—० (११—१, ११—८, १५—१३, १२—१०) असे वर्चस्व गाजवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: State rank table tennis tournament shubha bhat wins the title zws

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या