scorecardresearch

Premium

स्टीव्हन गेरार्ड लिव्हरपूलसाठी तारणहार

अतिशय थरारक रंगलेल्या लढतीत अतिरिक्त वेळेतील अखेरच्या मिनिटाला स्टीव्हन गेरार्डने पेनल्टीवर गोल करून लिव्हरपूलला लुडोगोरेट्स संघावर २-१ असा विजय मिळवून दिला.

स्टीव्हन गेरार्ड लिव्हरपूलसाठी तारणहार

अतिशय थरारक रंगलेल्या लढतीत अतिरिक्त वेळेतील अखेरच्या मिनिटाला स्टीव्हन गेरार्डने पेनल्टीवर गोल करून लिव्हरपूलला लुडोगोरेट्स संघावर २-१ असा विजय मिळवून दिला. या विजयामुळे लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत ‘ब’ गटात तीन गुणांची कमाई केली. अर्सेनलला मात्र बोरूसिया डॉर्टमंडकडून ०-२ असा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. गतविजेत्या रिअल माद्रिदने बसेलचे आव्हान ५-१ असे मोडीत काढले. अ‍ॅटलेटिको माद्रिदने ऑलिम्पियाकोसवर ३-२ असा निसटता विजय मिळवला.
२००९नंतर प्रथमच चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळणाऱ्या लिव्हरपूलला पदार्पणवीर बल्गेरियाच्या लुडोगोरेट्स संघाविरुद्ध विजयाची खात्री होती. मात्र ८० मिनिटापर्यंत दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. अखेर ८२व्या मिनिटाला मारिओ बालोटेल्लीने लिव्हरपूलचे खाते खोलले. पण अतिरिक्त वेळेतील पहिल्या मिनिटाला दानी अबालो याने गोल करत बरोबरी साधली. मात्र गोलक्षेत्रात जावी मँकिलोने केलेल्या चुकीचा फटका लुडोगोरेट्सला बसला. ९३व्या मिनिटाला लिव्हरपूलला पेनल्टी-किक मिळाल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा उठवत गेरार्डने गोल करून लिव्हरपूलला विजय मिळवून दिला.
स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीगमध्ये शानदार सुरुवात केली. मरेक सुची (१४व्या मिनिटाला, स्वयंगोल), गॅरेथ बॅले (३०व्या मिनिटाला), ख्रिस्तियानो रोनाल्डो (३१व्या मिनिटाला), जेम्स रॉड्रिगेझ (३७व्या मिनिटाला) आणि करिम बेंझेमा (७९व्या मिनिटाला) यांनी गोल लगावत रिअल माद्रिदच्या विजयावर मोहोर उमटवली. बसेलकडून एकमेव गोल डेर्लिस गोंझालेझने (३८व्या मिनिटाला) केला.

honda city and honda amaze special festiv edition launch india
वेरना, सियाझला टक्कर देण्यासाठी Honda ने लॉन्च केल्या ‘या’ फेस्टिव्ह एडिशन्स, ३१ ऑक्टोबरपर्यंत मिळणार…
Man holds were hiring placard during football match in Bengaluru
बंगळुरूमध्ये फुटबॉल मॅचमदरम्यान विचित्र पोस्टर झालं व्हायरल; नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
indri diwali collectors edition 2023 whisky
भारताची ‘ही’ दारू संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर, काय आहे किंमत?
Artist creates SRK portrait
SRK लेटर्सचा वापर करून बनवलं शाहरुख खानचं जबरदस्त पोट्रेट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “जबरा फॅन…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Steven gerrard rescues reds with injury time penalty in dramatic finale

First published on: 18-09-2014 at 03:35 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×