सोफिया :बल्गेरिया येथे सुरू असलेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेच्या मुख्य फेरीची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली असून भारतीय बॉक्सिंगपटूंपुढे खडतर आव्हान असणार आहे.

निखत झरिनला (५२ किलो वजनी गट) थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला असला, तरी सुमित आणि अंजली तुषीर यांना तुलनेने अधिक यशस्वी प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागणार आहे. ६६ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत अंजलीचा दोन वेळा जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या रशियाच्या सादत दाल्गातोव्हाशी सामना होईल. पुरुषांमध्ये आकाशला (६७ किलो) पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. परंतु सुमितला (७५ किलो) आगेकूच करण्यासाठी जागतिक रौप्यपदक विजेत्या झामबुलात बिझहामोव्हला पराभूत करावे लागेल. यंदा १० पुरुष आणि सात महिला असे भारताचे एकूण दहा बॉक्सिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

Vinesh, Anshu and Reetika earn three Olympic quota places
विनेश, अंशु, रितिकाला ऑलिम्पिक कोटा
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद