मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC) आणि व्हिक्टोरियन सरकारने मेलबर्नमध्ये भारत पाकिस्तान कसोटी मालिका आयोजित करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला आहे. वास्तविक, ऑक्टोबरमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्याच्या यशानंतर ही कल्पना आली आहे. परंतु दोन्ही देशांमधील राजकीय मुद्द्यांमुळे बीसीसीआय आणि पीसीबी प्रस्तावित द्विपक्षीय कसोटी मालिकेसाठी सहमती दर्शवेल अशी शक्यता नाही.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुस-या कसोटीच्या चौथ्या दिवशी सेन रेडिओवर बोलताना, एमसीसीचे सीईओ स्टुअर्ट फॉक्स यांनी खुलासा केला. ते म्हणाले क्लब आणि व्हिक्टोरियन सरकारने या कसोटीचे आयोजन करण्यासाठी संयुक्तपणे सीएशी संपर्क साधला होता. उल्लेखनीय म्हणजे, २०१३ पासून, भारत आणि पाकिस्तान विश्वचषक आणि आशिया कपमध्येच एकमेकांसमोर येतात. या व्यतिरिक्त द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात एकमेकांसमोर आलेले नाहीत. २००७ पासून दोन्ही संघ एकाही कसोटीत आमनेसामने आलेले नाहीत.

Afghanistan Cricketer rashid khan
क्रिकेटने अफगाणिस्तानमधील जनता आनंदी – रशीद खान
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

फॉक्स म्हणाले की, ”ऑक्टोबरमध्ये टी-२० विश्वचषकातील शेवटच्या चेंडूचा थरारक सामना पाहण्यासाठी एमसीजी येथे ९०,२९३ प्रेक्षक आल्याने एमसीसी दोन्ही देशांच्या कसोटी सामन्याचे यजमानपदासाठी रोमांचित होईल.”

फॉक्स पुढे म्हणाले. “आम्ही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोललो आहोत. मी व्हिक्टोरिया सरकारलाही ओळखतो. दरम्यान खरोखर व्यस्त वेळापत्रक, मी समजू शकतो, ते पुन्हा खूप क्लिष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की हे कदाचित सर्वात मोठे आव्हान आहे.”

फॉक्स यांनी विचारले की, फक्त ऑस्ट्रेलिया आणि व्हिक्टोरियाच नव्हे तर सर्वच देशांतील स्टेडियम्स भरलेली असतील तर छान होईल का? याला उत्तर देताना ते म्हणाले, ”आशा आहे की क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे आयसीसीकडे घेऊन जाईल. जेव्हा तुम्ही जगभरातील काही स्टेडियम्स रिकामे पाहतात, तेव्हा मला वाटते की सर्व स्टेडियम भरलेले असतील, तेव्हा खेळाची मजा दुप्पट होईल.”

बीसीसीआय आणि पीसीबीची मान्यता शक्य नाही –

हेही वाचा – AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांचा दुष्काळ संपवला; दक्षिण आफ्रिकेवर नोंदवला मोठा विजय

भविष्यातील दौऱ्याचे वेळापत्रक पाहता २०२३ ते २०२७ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणताही द्विपक्षीय क्रिकेट सामना होणार नाही. २०२३ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघ एकमेकांच्या देशांचा दौरा करण्यावरून भांडत आहेत. दोन्ही देशांचे राजकीय वातावरण पाहता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) जगातील कोणत्याही भागामध्ये द्विपक्षीय क्रिकेटला सहमती देतील अशी शक्यता फारच कमी आहे.