पीटीआय, बेल्लारी : राष्ट्रीय उपकनिष्ठ बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या आर्या गर्देला सर्वोत्तम उदयोन्मुख बॉक्सिंगपटूचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत आर्या आणि समीक्षा सोलंकी यांनी आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीत ५-० असा एकतर्फी विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्याच्या आर्याने स्पर्धेच्या अंतिम दिवशी ३६ किलो वजनी गटात गोव्याच्या सगुण शिंदेचा, तर समीक्षाने ४० किलो गटात उत्तर प्रदेशच्या साधनाचा सहज पराभव केला. कुमारी गटात हरयाणाने स्पर्धेत सात सुवर्णपदक पटकावली. हरयाणासाठी पायलने (४६ किलो) तमिळनाडूच्या गुणा श्रीवर ५-० असा विजय मिळवला. याशिवाय लक्षूने (६३ किलो) अरुणाचल प्रदेशच्या नबाम अनियाविरुद्ध विजय मिळवला. या स्पर्धेत हरयाणाने सात सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण १० पदके मिळवत एकूण ६० गुणांसह पहिले स्थान पटकावले, तर पंजाब आणि महाराष्ट्र अनुक्रमे ३८ आणि २७ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेत मणिपूरच्या जयश्री देवी आणि सेनादलच्या आकाश बधवारला सर्वोत्तम बॉक्सिंगपटू पुरस्कार मिळाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sub national boxing championships maharashtra arya best emerging boxer ysh
First published on: 28-05-2022 at 01:39 IST