पट्टाया (थायलंड) : भारताच्या सुहास यथिराज, प्रमोद भगत आणि कृष्णा नागर यांनी जागतिक अजिंक्यपद पॅरा-बॅडमिंटन स्पर्धेत विविध प्रकारातून पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत एकेरीच्या एसएल-४ विभागात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या यथिराजने फ्रान्सच्या अग्रमानांकित लुकास मझूरचे आव्हान २१-१६, २१-१९ असे संपुष्टात आणले. लुकास गतविजेता आणि पॅरालिम्पिकचा सुवर्णपदक विजेता आहे.

४० वर्षीय यथिराज सध्या उत्तर प्रदेश सरकारमध्ये युवक कल्याण विभागाचे सचिव, तर प्रणतीया रक्षक दलाचे महासंचालक आहे. विजेतेपदासाठी त्याची गाठ इंडोनेशियाच्या फ्रेडी सेतिआवानशी पडणार आहे. सेतिआवानने दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताच्याच सुकांत कदमचा २१-१३, २१-१९ असा पराभव केला.पुरुषांच्या एसएल-३ गटातून पॅरालिम्पिक विजेत्या प्रमोद भगतने आपलाच सहकारी मनोज सरकारचा २३-२१, २०-२२, २१-१८ असा पराभव केला. विजेतेपदासाठी त्याच्यासमोर ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलचे आव्हान असेल. बेथेलने भारताच्या नितिश कुमारला २१-१८, २०-२२, २१-१४ असे पराभूत केले.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ

हेही वाचा >>>T20 World Cup 2024 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांसाठी प्रचंड मागणी, तब्बल २०० पट अधिक लोकांनी केली नोंदणी

तसेच एसएच-६ गटातून अंतिम फेरी गाठताना कृष्णा नागरने ब्राझीलच्या व्हिक्टर तावारेसचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. आता त्याची गाठ चीनच्या लिन नैलीशी पडणार आहे.महिला विभागातून एसयू-५ गटातून मनीषा रामदासने फ्रान्सच्या मैद लेफोर्टचा १९-२१ २१-१२, २१-१४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. महिलांच्या एसएच-६ गटातून दुहेरीत रचना शैलेशकुमार-नित्या श्री समुथी सिवान या जोडीनेही अंतिम फेरी गाठली. त्यांनी इंडोनेशियाच्या दारिया बुजनिका-ओलिविया झ्मिगिएल जोडीला २१-१६, २१-१७ असे नमवले.