अन्वय सावंत

लिओनेल मेसी आणि ख्रिस्टियानो रोनाल्डो. गेली जवळपास दोन दशके फुटबॉल विश्वात सर्वाधिक चर्चेत असलेली ही दोन नावे. अर्जेटिनाचा मेसी आणि पोर्तुगालचा रोनाल्डो यांनी विविध विक्रम रचत, ‘अ-सामान्य’ कामगिरी करत फुटबॉलच्या इतिहासात स्वत:साठी वेगळे स्थान निर्माण केले. या दोघांचीही सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाते. मात्र, आता हे दोघे दिग्गज कारकीर्दीचा अंतिम टप्प्यावर आहेत. त्यामुळे मेसी आणि रोनाल्डो यांचे वारसदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु नॉर्वेचा अर्लिग हालँड आणि फ्रान्सचा किलियान एम्बापे या युवकांच्या रूपात या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
loksabha election 2024 Priority is given to local issues in the campaign in Marathwada
मराठवाड्यातील प्रचारात स्थानिक मुद्द्यांनाच प्राधान्य
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

२२ वर्षीय हालँड आणि २३ वर्षीय एम्पाबे यांच्याकडे फुटबॉलचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. या दोघांनीही कमी वयातच अनेक विक्रम मोडताना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्यातही हालँडने अलीकडच्या काळात केलेली कामगिरी अधिक लक्षवेधी ठरली आहे. यंदाच्या हंगामात इंग्लंडमधील आघाडीचा संघ मँचेस्टर सिटीकडून खेळताना हालँडने १३ सामन्यांतच २० गोल झळकावले आहेत. यात घरच्या मैदानावर विक्रमी सलग तीन हॅट्ट्रिकचाही समावेश आहे.

६ फूट ५ इंच उंची, एखाद्या बॉक्सिंगपटूप्रमाणे शरीरयष्टी, चेंडूसह व चेंडूविना वेगाने धावण्याची क्षमता, बचावपटूंनी दडपण टाकल्यानंतरही चेंडूवर ताबा ठेवण्याचे कौशल्य, ही हालँडच्या खेळाची वैशिष्टय़े आहेत. मात्र, अधिकाधिक गोलसाठी असणारी त्याची भूक, प्रतिस्पर्धी संघांतील बचावपटूंना चकवून योग्य वेळी गोलसमोर पोहोचण्याची त्याची क्षमता आणि आक्रमक मानसिकता या गोष्टी त्याला अन्य युवा आघाडीपटूंपेक्षा वरचढ ठरवतात. माजी फुटबॉलपटू अल्फी हालँड यांचा मुलगा अर्लिगने लहान वयातच व्यावसायिक फुटबॉलपटूचे बनण्याचे स्वप्न बाळगले. नॉर्वेतील संघ ब्रायनकडून वयाच्या १५व्या वर्षी त्याला व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. या संघाकडून काही सामने खेळल्यानंतर नॉर्वेतील नामांकित संघ मोल्डेने त्याला आपल्या

संघात समाविष्ट करून घेतले. या संघाकडून दोन हंगामांत खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रियन संघ रेड बुल साल्झबर्गने खरेदी केले. या संघाकडून केलेल्या कामगिरीमुळे हालँड खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात लोकप्रिय स्पर्धा चॅम्पियन्स लीगमध्ये पदार्पणात हालँडने गेंकविरुद्ध पहिल्या सत्रातच हॅट्ट्रिकची नोंद केली. उत्तरार्धात त्याने आणखी एक गोल केल्यामुळे साल्झबर्गने हा सामना ६-३ अशा फरकाने जिंकला. त्यानंतर पुढील दोन सामन्यांत त्याने बलाढय़ लिव्हरपूलविरुद्ध एक आणि नापोलीविरुद्ध दोन गोल झळकावले. त्यामुळे चॅम्पियन्स लीग कारकीर्दीतील पहिल्या तीनही सामन्यांत गोल करणारा हालँड केवळ दुसरा किशोरवयीन फुटबॉलपटू ठरला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. साल्झबर्गकडून दोन हंगामांत सर्व स्पर्धात मिळून २७ सामन्यांत २९ गोल केल्यानंतर त्याला युरोपातील आघाडीच्या संघांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हालँडने जर्मनीतील क्लब बोरुसिया डॉर्टमुंडकडून खेळण्यास पसंती दर्शवली. 

डॉर्टमुंडचा संघ युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आणि त्यांना घडवण्यासाठी ओळखला जातो. रॉबर्ट लेवांडोवस्की, मार्को रॉइस, मॅट हुमल्स आणि मारियो गोट्झे यांसारखे नामांकित खेळाडू डॉर्टमुंडकडून केलेल्या दर्जेदार कामगिरीमुळेच प्रकाशझोतात आले. हालँडला हे व्यासपीठ उपलब्ध झाल्यानंतर त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. डॉर्टमुंडचे प्रतिनिधित्व करताना तीन हंगामांमधील ८९ सामन्यांत ८६ गोल केल्यानंतर हालँडची विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये गणना केली जाऊ लागले. त्याने मेसी, रोनाल्डो आणि लेवांडोवस्की यांसारख्या खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवले. परंतु डॉर्टमुंड संघाला काही आर्थिक मर्यादा असल्याने हालँडला याहून मोठी झेप घ्यावी लागणार हे स्पष्ट होते.

यंदाच्या हंगामापूर्वी मँचेस्टर सिटीने हालँडला ६ कोटी युरो इतक्या किमतीत खरेदी केले. सिटीने दाखवलेला हा विश्वास हालँडने सुरुवातीपासूनच सार्थकी लावला. त्याने प्रीमियर लीग पदार्पणात वेस्ट हॅमविरुद्ध दोन गोल, तर सिटीकडून चॅम्पियन्स लीग पदार्पणात सेव्हियाविरुद्ध पुन्हा दोन गोल नोंदवले. तसेच क्रिस्टल पॅलेस, नॉटिंगहॅम फॉरेस्ट आणि मग मँचेस्टर युनायटेड यांच्याविरुद्ध घरच्या मैदानावरील सलग तीन प्रीमियर लीग सामन्यांत हॅट्ट्रिक करण्याची अविश्वसनीय कामगिरीही हालँडने केली.

त्यामुळे प्रीमियर लीगमध्ये सर्वात कमी सामन्यांत (८) तीन हॅट्ट्रिकचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये हालँडने आतापर्यंत २२ सामन्यांत २८ गोल झळकावले असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सर्वात कमी सामन्यांत १०, १५ आणि २५ गोलचे विक्रम हालँडच्या नावे आहेत. हालँडने पुढेही अशीच कामगिरी सुरू ठेवल्यास भविष्यात त्याचे पेले, मॅराडोना, मेसी आणि रोनाल्डो या दिग्गजांसोबत नाव जोडले गेल्यास नवल वाटायला नको!