अनुभवी सुनील गावस्कर यांनी भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीच्या तंत्रातील त्रुटींकडे लक्ष वेधले आहे, ज्यामुळे तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरत आहे. गावसकर यांच्या मते, सूर्यकुमारचा स्टान्स अतिशय खुला आहे, जो टी-२० मध्ये काम करतो. परंतु एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रभावी ठरत नाही आणि त्याच्यासाठी समस्या निर्माण करत आहे. लिटिल मास्टरने उजव्या हाताच्या फलंदाजाला फलंदाजी प्रशिक्षकासोबत वेळ घालवण्याचा सल्लाही दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार आपले खाते उघडू शकला नाही. आणि तोच किस्सा विशाखापट्टणममध्ये पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा मिचेल स्टार्कने उजव्या हाताच्या फलंदाजाला खाते उघडू दिले नाही. तो फक्त एका चेंडूचा सामना करू शकला आणि तंबूत परतला . भारतीय संघाला सुरुवातीपासूनच धक्का बसला आणि सूर्यकुमारकडून लढाऊ खेळीची अपेक्षा होती, पण त्याने निराशा केली.

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला चांगली कामगिरी करून विश्वचषकावर आपली दावेदारी मांडण्याची संधी होती. पण पहिल्या दोन सामन्यांत त्याला यश आले नाही. त्यामुळे सूर्याला तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी करुन दाखवावी लागेल. कारण दुसरीकडे चाहते संजू सॅमसनला संधी देण्याची मागणी करत आहेत. अशा स्थितीत त्याला मोठी खेळी करुन स्वत:ला सिद्ध करावे लागेल.

हेही वाचा – Suryakumar Yadav: टी-२० मधील हिरो सूर्या वनडेत झिरो; चाहत्यांकडून ‘या’ खेळाडूला संधी देण्याची होतेय मागणी

सूर्यकुमार यादवच्या वनडेतील संघर्षाबाबत बोलताना गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, “त्याला तांत्रिक अडचणी येत आहेत. याशिवाय त्याचा स्टान्सही खुला आहे. टी-२० क्रिकेटसाठी हे चांगले आहे. कारण कोणत्याही ओव्हरपिच चेंडूला फ्लिक केले जाऊ शकते आणि षटकार मारला जाऊ शकतो. पण एकदिवसीय सामन्यांमध्ये, जेव्हा चेंडू पायाजवळ ठेवला जातो, तेव्हा या स्टान्ससोबत, बॅट नक्कीच अक्रॉस येईल. ती थेट येऊ शकत नाही. त्यामुळे चेंडू स्विंग झाला तर त्यांना अवघड जाईल. यातून बाहेर कसे पडायचे यासाठी त्याला फलंदाजी प्रशिक्षकासोबत वेळ घालवणे आवश्यक आहे.”

सूर्याची वनडेतील कामगिरी सामान्य राहिली –

टी-२० मध्ये सूर्यकुमार यादवने गेल्या दीड वर्षात खूप जबरदस्त कामगिरी केली आहे. पण त्याला अजूनही एकदिवसीय क्रिकेटचा फॉर्म्युला सापडलेला नाही. या फॉरमॅटमध्ये त्याने २२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २५.४७ च्या सरासरीने ४२२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर फक्त दोन अर्धशतके आहेत. हे आकडे त्यांच्या क्षमतेनुसार अगदी क्षुल्लक आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar advised suryakumar yadav to spend time with a batting coach vbm
First published on: 20-03-2023 at 11:48 IST