Sunil Gavaskar Emotional Post Nana Patekar Passing Away Tribute: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी वयाच्या ७५व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. नानांच्या निधनाने हिंदी व मराठी सिनेविश्वासह इतर क्षेत्रातील त्यांच्या मित्रपरिवारामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. फक्त मनोरंजन क्षेत्र नव्हे तर इतर क्षेत्रातील अनेकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. क्रिकेट दिग्गज सुनील गावस्करांना तर ते आपला आदर्श मानत. नानांच्या निधनानंतर सुनील गावस्करांचे नानांबरोबरचे फोटो व भावुक कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे.
नाना पाटेकरांना मिठी मारल्याचे आणि आनंदाने भेटतानाचे दोन फोटो सुनील गावस्करांनी शेअऱ केले आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, “हृदय पिळवटून टाकणारी बातमी… माझा नाना फ्रॉम पुना आता आपल्याला सोडून देवाघरी गेला. त्यांची खूप आठवण येईल. त्यांच्या प्रेमळ रागावण्याची, आपुलकीने ओरडण्याची आणि त्यांच्या अपार मायेची कायम आठवण राहील.”
नाना पाटेकर यांना क्रिकेटचं प्रचंड वेड होतं. नानांनी मुलाखतीत मी क्रिकेट वेडा माणूस आहे असंही सांगितलं आहे. सचिन तेंडुलकर महान फलंदाज पण आमचा हिरो सुनील गावस्कर असं त्यांनी मुलाखतीदरम्यान म्हटलं होतं. सुनील गावस्कर आणि नाना पाटेकर यांची घट्ट मैत्री होती. अनेकदा ते कामानिमित्त किंवा निवांत गप्पा मारण्यासाठी देखील अनेकदा भेटायचे. नाना क्रिकेटप्रेमी असल्याने क्रिकेट विषयावर ते बराच वेळ गप्पा मारायचे. सुनील गावस्कर ज्या पद्धतीने क्रिकेट खेळायचे त्याचं नानांना विशेष कौतुक होतं. इतकंच काय तर नाना पाटेकर सुनील गावस्करांना आपला आदर्श मानायचे.
नाना पाटेकरांनी सुनील गावस्करांबरोबरचा मागे फोटो शेअर करत त्याला ‘मी आणि माझा आदर्श’ असं कॅप्शन दिलं होतं. याशिवाय रेडिओ सिटी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सुनील गावस्कर आपला आदर्श का होते, हे सांगितलं होतं. एकाग्र होणं म्हणजे काय हे सुनीलने मला त्याच्या खेळातून दाखवलं आणि म्हणूनच तो माझा आदर्श असा उल्लेख सुनील गावस्करांनी केला. आता आपल्या लाडक्या मित्रासाठी सुनील गावस्करांनी त्यांचे गोड हसरे फोटो शेअर करत भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आणि त्याची कायम आठवण येत राहील असंही म्हटलं आहे.
