scorecardresearch

अहमदाबादमध्ये शुबमनचा झंझावात! शतक ठोकल्यानंतर गावसकर म्हणाले, “त्याने स्वत:ला सांभाळलं तर भविष्यात…”

भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने आक्रमक फलंदाजी करून शतकी खेळी केली. २३५ चेंडूत १२८ धावा कुटून शुबनमने भारताला चांगली सुरुवात करून दिली.

Sunil Gavaskar Statement On Shubman gill
सुनील गावसकर यांनी शुबमन गिलबाबत मोठं विधान केलंय. (Image-Indian Express)

Sunil Gavaskar Statement On Shubman gill : टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज म्हणून युवा खेळाडू शुबमन गिल दिवसेंदिवस धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या शेवटच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावांची मजल मारली. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियानेही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलने आक्रमक फलंदाजी करून शतकी खेळी केली. २३५ चेंडूत १२८ धावा कुटून शुबनमने भारताला चांगली सुरुवात करून दिली. शुबमनच्या या वादळी खेळीमुळं भारताचे दिग्गज क्रिकेटपटू त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भारताचे माजी कर्णधाक आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनीही शुबमनवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

दुपारच्या सत्रात लंच ब्रेकदरम्यान स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना सुनील गावसकर यांनी गिलबाबत बोलताना म्हटलं, “शुबमनकडे इतर फलंदाजांच्या तुलनेत खूप जास्त वेळ आहे. जेव्हा तो डिफेंसिव स्ट्रोक खेळतो, तसंच मिशेल स्ट्रार्कच्या गोलंदाजीवरही तो ज्याप्रकारे फूटवर्क करतो, ज्याप्रमाणे त्याची बॅट सरळ असते आणि फॉरवर्ड डिफेंस स्ट्रोक खेळतो, ते पाहून खूप आनंद होतो. शुबमनकडे आत्मविश्वास आहे. तो फक्त बॅकफूटवरच खेळत नाही, तर फ्रंट फूटवर खेळण्यातही तो माहीर आहे. गिलचा डिफेंच खूप मजबूत आहे. तसंच तो चेंडूवर फटकाही छान मारतो आणि टेस्ट क्रिकेटमध्ये या गोष्टींची आवश्यकता असते.”

नक्की वाचा – Video : शुबमन गिलने टीम इंडियाला दिले ‘शुभ’संकेत! ९७ धावांवर असताना चेंडू हवेत उडाला होता, पण…

तसंच गावसकर पुढं बोलताना म्हणाले, “वेगवान गोलंदाजांसमोर मागे-पुढे होऊन खेळणं सोपं नाही. पण शुबमनला चेंडूचा वेग आणि दिशा समजणे खूप सोपे जाते. जर कोणत्याही फलंदाजाकडे वेळ आहे आणि त्याने जर करिअरची काळजी घेतली, तर तो भविष्यात ८-१० हजार धावा करेल.” २०१२ मध्ये गाबामध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयात गिलने दुसऱ्या इनिंगमध्ये १४६ चेंडूत ९१ धावांची खेळी केली होती. व्हाईट बॉल क्रिकेट फॉर्मेटमध्ये त्याच्या फलंदाजीत अस्थिरता होती. पण गिलने गेल्या काही दिवसांपासून फलंदाजीत सुधारणा केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 19:03 IST