Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket : भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले की जो रूट सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. पण बीसीसीआयला हे नको आहे. तसेच जो रुटने सचिनचा विक्रम मोडला तर कसोटी क्रिकेटसाठी चांगले असेल, असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना सुनील गावसकर यांनी मायकेल वॉनला खडसावत विचारले की, जो रुटने सचिनचा विक्रम मोडला तर कसे कसोटी क्रिकेटसाठी चांगले असेल आणि आता काय वाईट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसोटी क्रिकेटमध्ये सध्याचा इंग्लंड संघाचा खेळाडू जो रुट सचिनचा कसोटीत सर्वाधिक शतके आणि धावांचा विक्रम मोडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रूटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याबाबत चर्चा इंग्लिश मीडिया आणि त्यांच्या क्रिकेटपटूंमध्ये सुरू झाली आहे, दरम्यान मायकल वॉनने गेल्या आठवड्यात एक वक्तव्य केले होते, की रूटने सचिनला मागे टाकल्याने कसोटी क्रिकेटसाठी चांगले असेल. पण हा विक्रम फक्त भारतीय खेळाडूनेच मोडावा यासाठी बीसीसीआय सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल. त्याच्या विधानाला सुनील गावसकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

भारतावरील टीकेला आक्रमकपणे उत्तर दिले पाहिजे –

सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स स्टारमधील त्यांच्या स्तंभात लिहिले आहे की, “भारतावरील टीकेला आक्रमकपणे उत्तर दिले पाहिजे, कारण हीच भाषा त्यांना समजते. अलीकडे मी कोणाला तरी असे म्हणताना ऐकले की, जर जो रूटने सचिन तेंडुलकरचा कसोटीत सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रम मागे टाकला, तर ते कसोटी क्रिकेटसाठी चांगले होईल. कृपया आम्हाला सांगा, तेंडुलकरचा हा विक्रम असताना कसोटी क्रिकेटमध्ये सध्या काय वाईट आहे आणि एखाद्या इंग्लिश खेळाडूने हा विक्रम केल्यास कसोटी क्रिकेट कसे चांगले होईल? कृपया आम्हाला सांगा.”

हेही वाचा – Modi Meets Navdeep Singh : पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नवदीप सिंहकडून मोदींना कॅप गिफ्ट; पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीने जिंकली मनं

भारत प्रत्येक हंगामात अर्धा डझनहून अधिक कसोटी सामने खेळतो –

सुनील गावसकर पुढे म्हणाले, “काही विचित्र कारणास्तव, परदेशात असा समज आहे की बीसीसीआयला कसोटी क्रिकेट आवडत नाही. ही एक हास्यास्पद धारणा आहे, कारण भारत प्रत्येक हंगामात अर्धा डझनहून अधिक कसोटी सामने खेळतो, मग ते मायदेशात असो किंवा परदेशात. फक्त आयपीएल अत्यंत यशस्वी आहे, याचा अर्थ बीसीसीआयला कसोटी क्रिकेटला चालना देण्यात रस नाही असा होत नाही. पण ही गोष्ट परदेशी माध्यमांद्वारे पसरवले जात आहे.”

हेही वाचा – WTC Final 2025 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

सचिन तेंडुलकरचा कोणता विक्रम चर्चेत?

२००८ मध्ये ब्रायन लाराचा विक्रम मोडल्यानंतर सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने २०० सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ५० कसोटी शतके झळकावणारा सचिन हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके झळकावली आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात जो रुटने सलग दोन शतके झळकावल्याने, तो चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil gavaskar slams michael vaughan for comment on joe root overtaking sachin tendulkar will make test cricket interesting vbm
Show comments