scorecardresearch

७ षटक, ७ मेडन अन् ७ विकेट…IPL सुरु होण्याआधीच सुनील नारायणने मैदान गाजवलं, पाहा Viral पोस्ट

यंदाच्या आयपीएलमध्ये सुनील नारायणवर सर्वांच्या नजरा लागणार आहेत, कारण नुकतंच त्याने अप्रतिम गोलंदाजी करून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Sunil Narine Latest News Update
सुनील नारायणने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. (Image-Indian Express)

Best Bowling in Cricket History : इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत सुनील नारायणनेही नाव कोरलं आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सुनील नारायणवर विशेष लक्ष असणार आहे. आयपीएल २०२३ सुरु होण्यापूर्वीच सुनीलने एका सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. सुनीलने सामन्यात ७ षटक फेकले. ज्यामध्ये सर्वच षटक मेडन होते. विशेष म्हणजे या स्पेलमध्ये त्याने ७ फलंदाजांची विकेटही घेतली.

वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात येणाऱ्या एका स्थानिक टुर्नामेंटमध्ये सुनील नारायणने ही चमकदार कामगिरी केलीय. क्वीन्स पार्क क्रिकेट क्लबच्या माध्यमातून सुनील नारायण खेळत आहे. क्लार्क रोड यूनायटेडविरोधात सुनीलने भेदक गोलंदाजी करून हा कारनामा केला. सुनीलच्या फिरकीच्या जादूमुळं विरोधी संघ फक्त ७६ धावांवर गारद झाला.

सुनील नारायणने ७ षटकांमध्ये ७ विकेट घेतले आणि एकही धाव दिली नाही. याशिवाय शॉन हॅकलेटने १८ धावा देऊन २ विकेट घेतल्या. क्लार्करोडसाठी सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजाचा स्कोर २१ होता. या सामन्यात क्वीन्स पार्कच्या टीमने ३ विकेट गमावत २६८ धावा केल्या आणि १९२ धावांचं लीड घेतलं.

नक्की वाचा – IPL सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ दिग्गज खेळाडू CSK टीममधून बाहेर

सामन्याचा स्कोर अपडेट

क्लार्क रोड यूनायटेड – ७६/१०, सुनील नारायण- ७/१०
क्वीन्स पार्क क्रिकेट क्लब – २६८/३, इसाह राजा – १००

३४ वर्षीय सुनील नारायणला आयपीएलचा मिस्ट्री गोलंदाज म्हटलं जातं. त्याने आतापर्यंत आयपीएल करियरमध्ये एकूण १४८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर १५२ विकेट्सची नोंद आहे. सुनील नारायणने ७ वेळा आयपीएलमध्ये ४ विकेट्स आणि एकदा ५ विकेट्स घेण्याची अप्रतिक कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय करियरमध्ये त्याने वेस्टइंडिजसाठी ६ सामन्यांत २१ विकेट, ६५ वनडेत ९२ विकेट आणि ५१ टी-२० मध्ये ५२ विकेट घेतले आहेत. आयपीएल २०२३ मध्ये सुनील कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या