Sunrisers Hyderabad Orange Armour Jersey: इंडियन प्रीमियर लीग २०२३ साठी, सर्व संघ त्यांच्या नवीन जर्सी लाँच करत आहेत. मुंबई इंडियन्स ते लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२३ साठी त्यांच्या नवीन जर्सी लाँच केल्या आहेत. दरम्यान, एकेकाळचा चॅम्पियन संघ सनरायझर्स हैदराबादनेही गुरुवारी आपली नवीन जर्सी (SRH Jersey 2023) लाँच केली आहे. एसआरएच संघाने यावेळी त्यांच्या जर्सीत अनेक बदल केले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने आगामी आयपीएल हंगामासाठी आपल्या नवीन जर्सीला ऑरेंज आर्मर असे नाव दिले आहे. संघाच्या जर्सीची रचना हैदराबाद शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरित आहे. ऑरेंज हा तेलंगणा राज्याचा अधिकृत रंग आहे. या कारणास्तव, संघाने २०१३ पासून सर्व हंगाम या रंगाने खेळले आहेत. यावेळी संघाच्या जर्सीमध्ये स्लीव्ह आणि खांद्यावर काळा आणि केशरी रंग देण्यात आला आहे. जे या जर्सीला सुंदर बनवत आहे. हैदराबादने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला असून या व्हिडिओमध्ये उमरान मलिक, मयंक अग्रवाल आणि वॉशिंग्टन सुंदर दिसत आहेत.

rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
Ambati Rayudu Hosts Mandatory Biryani Party for Chennai Super Kings Players in Hyderabad
IPL 2024: अंबाती रायुडूने CSK च्या खेळाडूंना दिली बिर्याणीची मेजवानी, पाहा VIDEO
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
Mumbai Chennai Gujarat Bangalore and Delhi attention to the performance of these teams in IPL
विश्लेषण : मुंबई, चेन्नई सहाव्यांदा, की बंगळूरु पहिल्यांदा… आयपीएलमध्ये यंदा कोणाची सरशी?

आयपीएल २०२३ साठी, सनरायझर्स हैदराबादने जर्सी व्यतिरिक्त त्यांच्या संघात बरेच बदल केले आहेत. एसआरएचने आगामी हंगामासाठी एडन मार्करामला त्यांचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. त्याचबरोबर संघाने गोलंदाजीपासून फलंदाजी प्रशिक्षकापर्यंत बदल केले आहेत. यावेळी संघाने आपल्या संघात मयंक अग्रवाल आणि हॅरी ब्रूकसारख्या धडाकेबाज फलंदाजांचा समावेश केला आहे.

हेही वाचा – IPL 2023: दिल्ली कॅपिटल्सच्या नव्या कर्णधार आणि उपकर्णधाराच्या नावावर शिक्कामोर्तब; ‘या’ खेळाडूंच्या हाती असणार कमान

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ –

हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, एडन मार्कराम, अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॉन्सन, ग्लेन फिलिप्स, फझलहक फारुकी, मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन, आदिल रासन, मार्क्सन, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, अकिल हुसेन, अनमोलप्रीत सिंग, विव्रत शर्मा, समर्थ व्यास, सनवीर सिंग, उपेंद्र सिंग यादव, मयंक डागर.