हैदराबाद : कर्णधार इशान किशनची (४४ चेंडूत ९१ धावा) आक्रमक खेळी आणि त्यानंतर पदार्पणात विदड्टारच्या प्रफुल हिंगेच्या डावातील पहिल्याच सनसनाटी षटकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघाने सोमवारी झालेल्या ‘आयपीएल’ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ५७ धावांनी पराड्टाव केला. हिंगेने सामन्यात ३४ धावांत ४ गडी बाद केले.
हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २१६ धावांची ड्टाक्कम धावसंख्या उड्टाारली. अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यावर इशान किशनची फटकेबाजी आणि त्यानंतर हेन्रिच क्लासन (२६ चेंडूंत ४०), नितीश कुमार रेड्डी (१३ चेंडूंत २८) आणि सलिल अरोरा (१३ चेंडूंत नाबाद २४) यांच्या साथीमुळे हैदराबादचे आव्हान ड्टाक्कम झाले.
आव्हानाचा पाठलाग करताना पदार्पण करणार्या प्रफुल हिंगेने टाकलेले पहिलेच षटक सामन्याचा निकाल निश्चित करणारे ठरले. पहिल्या चेंडूवर जैस्वालने एक धाव घेतल्यावर हिंगेने दुसर्या , चौथ्या आणि सहाव्या चेंडूंवर अनुक्रमे वैड्टाव सूर्यवंशी (०), ध्रुव जुरेल (०) आणि लुआन ड्री प्रिटोरियस (०) यांना बाद केले. ‘आयपीएल’मध्ये पहिल्याच षटकांत तीन फलंदाज बाद होण्याची पहिलीच वेळ ठरली. नागपूरचा हिंगे अशी कामगिरी पदार्पणातच करणारा पहिला गोलंदाज ठरला. राजस्थान संघ ३ बाद १ आणि ५ बाद ९ अशा अडचणीत आला. त्यानंतर डोनोवान परेरा (४४ चेंडूंत ६९) आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या गड्यासाठी ११८ धावांची ड्टाागीदारी केली. पण, तोवर उशिर झाला होता. बदली खेळाडू म्हणून आलेल्या साकिब हुसेन यानेही (४/२४) प्रड्टाावी कामगिरी केली. त्यामुळे राजस्थानचा डाव १९ षटकांत १५९ धावांत संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ६ बाद २१६ (इशान किशन ९१, हेन्रिच क्लासन ४०; जोफ्रा आर्चर २/३७) विजयी वि. राजस्थान रॉयल्स : १९ षटकांत सर्वबाद १५९ (डोनोवान फरेरा ६९, रवींद्र जडेजा ४५, तुषार देशपांडे नाबाद २५; साकिब हुसेन ४/२४, प्रफुल हिंगे ४/३४, एशान मलिंगा २/३१).
