India vs West Indies South Africa vs Australia England vs Sri Lanka 3 ODI Matches Today: २७ सप्टेंबर हा दिवस क्रिकेटप्रेमींसाठी ब्लॉकबस्टर असणार आहे. या एकाच दिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३ विविध सामने खेळवले जाणार आहेत. अवघ्या काही वेळेतच सहा संघ मैदानात उतरणार आहेत. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही तयारी म्हणून या सामन्यांकडे पाहिलं जात आहे. या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणकोणते संघ आहेत, जाणून घेऊया.
पुढील वर्षी आफ्रिकन भूमीवर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या गतविजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता भारत आणि उपांत्य फेरीतील दक्षिण आफ्रिका हे संघ सध्या खेळत आहेत; तर उपांत्य फेरीतील दुसरा संघ असलेला न्यूझीलंड नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. तसेच, श्रीलंका आणि इंग्लंड हे संघही तयारी करत असून सध्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आज सुरू होत असून, पहिला सामना केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे दुपारी २:०० वाजता खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातही एकदिवसीय मालिका सुरू आहे; या मालिकेतील दुसरा सामना आज जोहान्सबर्ग येथे दुपारी १:३० वाजता होणार असून, यात ऑस्ट्रेलिया पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, श्रीलंकेचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, आज ‘द ओव्हल’वर दुपारी ३:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सुरू होणार आहे. ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.
२७ सप्टेंबरला होणारे तीन एकदिवसीय सामने
दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया – दुपारी १.३० वाजता
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज – दुुपारी २ वाजता
इंग्लंड विरूद्ध श्रीलंका – दुपारी ३ वाजता
भारताचा संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उप-कर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर
वेस्ट इंडिजचा संघ
शे होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्हज, अमीर जांगू, अल्झारी जोसेफ, शामार जोसेफ, विलेम लुईस, गुडाकेश मोती, कीमो पॉल, शेरफेन रदरफोर्ड, जेडन सील्स
